अन्य

जऊळके दिंडोरी ग्रामपंचायतीत पत्नी सरपंच तर पतीची उपसरपंचपदी निवड

Spread the love

 रवी जगताप / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता 

पत्नी सरपंच तर पतीची उपसरपंचपदी निवड

                तालुक्यातील महत्वाची समजली जाणार्‍या जऊळके दिंडोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भारती तुकाराम जोंधळे यांची सरपंचपदी जनतेतून निवड झाली होती.

              काल उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत पती तुकाराम हिरामण जोंधळे यांची निवड झाली. परीसरातुन पत्नी सरपंच व पती उपसरपंच पदासाठी निवड झाल्याचा प्रथमच योग आला असल्याचे जोंधळे दाम्पत्याचा विशेष कौतुक होत आहे. जऊळके-दिंडोरी येथील उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तुकाराम हिरामण जोंधळे व कुणाल प्रकाश बागुल हे दोन अर्ज प्राप्त झाल्यानंतर माघारीच्या मुदतीत माघार न झाल्याने निवडणूक घेण्यात आली.

               यात तुकाराम जोंधळे यांनी सहा तर कुणाल बागुल यांना पाच मते मिळाल्याने तुकाराम जोंधळे यांना विजयी घोषित करून उपसरपंचपदी त्यांची निवड झाल्याचे निवडणुकीनिर्णय अधिकार्‍यांनी जाहिर केले. यावेळी निवडणुक निरीक्षण अधिकारी परदेशी, चिटणीस हिरालाल पाटील, अध्याशा अधिकारी सरपंच भारती जोंधळे यांनी काम बघितले.

            यावेळी अंबाबाई बागुल, अरूणा वाघ, भगवंत गोतरणे, रूपाली उजे, आशा गांगुर्डे, आशा जोंधळे,खंडु गोतरणे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी नवनियुक्त सरपंच व उपसरपंच जोंधळे दाम्पत्याचा विशेष सत्कार केला.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822917037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत