आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता
दर्शना पवार हत्याकांड असो की सदाशिव पेठेत तरुणीवर झालेला हल्ला, या दोन्ही घटनांनंतर पुणे शहर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. एका बाजूला संपुर्ण शहरात कोम्बिंग आणि ऑल आउट ऑपरेशन सुरू असून आता तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप सेवा सुरू करण्यात आली आहे.
आता पुणे शहरातील नागरिक थेट पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्याकडे तक्रार करू शकणार आहेत. पुणे शहर पोलिसांकडून आता तक्रार करण्यासाठी नवीन व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. 8975953100 या नंबर वर कोणीही कधी ही तक्रार करू शकतात. पोलीस आयुक्त यांनी सुरू केलाला व्हॉट्स ॲप नंबर सेव्ह करून तुमच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना आणि अभिप्राय देण्यासाठी मेसेज करू शकतात.
त्यासोबतच इतर घटनांचा आढावा घेऊन कारवाई करण्यात येणार असून तातडीच्या सेवेसाठी 112 डायल करा असे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. याबाबत सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- ९८२२११७०३७/९८२२८१७०३७