आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता
मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार व मा पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस अधिकारी यांची मिटींग घेवून, सर्व अधिकारी व अंमलदार यांचे विवीध टिम तयार करून गुन्हेगार प्रतीबंधक कारवाई करण्यासाठी तसेच नागरीकांना मनमोकळे फिरता येईल याकरीता ऑलआऊट ऑपरेशन राबविले.
दिनांक ०८/०७/२०२३ रोजीचे ऑल आऊट ऑपरेशनचे दरम्यान गुन्हेगार चेकींग चालु असताना गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री शब्बीर सैय्यद व त्यांचे पथक असे फरासखाना पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दत्तमंदिर बुधवार पेठ येथे आले असता पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिंहगड रोड येथे रहाणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे ओकांर अंभुरे रा गारमाळा धायरी, पुणे हा वैश्यागमनासाठी बुधवार पेठ, पुणे येथे येणार असून त्याचेकडे पिस्टल आहे. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली बुधवार पेठ येथे सापळा रचला असता ओंकार रामप्रकाश अंभुरे, वय २१ वर्ष, रा. साक्षी अपार्टमेन्ट, तिसरा मजला, लेन नं. १२, गारमाळ धायरी गाव, पुणे यास ताब्यात घेतले त्याचे अंगझडीमध्ये किं रु ६०,०००/- चा एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले त्याबाबत फरासखाना पोलीस ठाणे गु र नं १२० / २३, आर्म अॅक्ट ३ / २५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर,श्री.संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १, पुणे शहर, श्री. सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट – १, कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सैय्यद, सहा. पोलीस निरीक्षक, आशिष कवठेकर, पोलीस उप-निरीक्षक सुनिल कुलकर्णी, अजय जाधव, पोलीस अंमलदार, दत्ता सोनवणे, राहुल मखरे अमोल पवार, शशीकांत दरेकर, विठ्ठल सांळुखे, महेश बामगुडे, अभिनव लडकत यांचे पथकाने केली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- ९८२२११७०३७/९८२२८१७०३७