अन्य

दिंडोरी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याने शेतकऱ्या वर हल्ला

Spread the love

रवी जगताप / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता

                 शेतात दबा धरून बिबट्या ने शेतकऱ्या वर हल्ला केल्याची घटना घडली आहे. आपल्या शेतात गवत कापत असताना बिबट्या हा दबा धरून बसलेला होता. तितक्यात बिबट्याने या शेतकऱ्यावर हल्ला चढवला आहे. यामध्ये शेतकरी जखमी झाला आहे.उपचारासाठी त्या शेतकऱ्याला खेडगाव येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

                   सविस्तर माहिती अशी की, बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला शेतकऱ्यांना आसमानी सुलतानी अशा विविध संकटांबरोबर सध्या जंगली प्राणी बिबट्याच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे बाकीराव हरी जाधव हे आपल्या शेतात विहिरीजवळ गवत कापण्याचे काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने मागून त्यांच्यावर हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाले.त्याच्यावर खेडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत याप्रसंगी नागरिकांनी संताप व्यक्त केला असून वनविभागाने या बाबीकडे अतिशय गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे बिबट्या हा पंचक्रोशीत बोपेगाव, जउळके, सोनजांब, कावळेवाडी, या सर्व परिसरात नागरिकांना आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने लवकरात लवकर परिसरात पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे.अशी मागणी येथील स्थानिक करत आहे.

साजिद शेख 

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत