अन्य

चामर लेणी येथे स्वच्छता मोहिम, 400 किलो कचरा संकलित

Spread the love

इम्रान अत्तार / विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक

                स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत “इंडियन स्वच्छता लिग” या केंद्र शासनाच्या स्पर्धेत नाशिक मनपाने “Nashik Zealers” या संघासह सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या अंतर्गत दि. १७/९/२०२२ रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत पंचवटी विभागातील गजपंथ सिद्धक्षेत्र चामार लेणी येथे मनपाचे आयुक्त तथा प्रशासक मा डॉ. श्री चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सुमारे 400 किलो कचरा संकलित करण्यात आला आहे. मनपाचे पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राबडिया, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यावेळी उपस्थित होते. या स्वच्छ अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत विविध स्वयंसेवकांसोबत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.

                   या स्वच्छता मोहीमेत नामको कॉलेजचे २५ विद्यार्थी, श्री हर्षल इंगळे मित्र परिवार यांचे २० स्वयंसेवक, कपिला बचाव मंचचे योगेशजी बर्वे आणि त्यांचे सहकारी यांनी सहभाग घेतला. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता निरीक्षक दुर्गादास मालेकर आणि ४१ स्वच्छता कर्मचारी यांचाही सहभाग होता. या मोहिमेत गजपंथ सिद्धक्षेत्र चामार लेणी येथील प्लास्टिक कचरा संकलित करुन परिसरातील रस्ते स्वच्छ करण्यात आले आहेत.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822117037 / +919822817037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत