अन्य

नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत ओपन स्ट्रीट इव्हेंट अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आणि पालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन…

Spread the love

अनिस शेख / उपसंपादक – दक्ष पोलीस वार्ता, नाशिक.

                   आज दि. १८ सप्टेंबर २०२२ रोजी स्मार्ट सिटीज् मिशन, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अॅण्ड अर्बन अफेअर्स (MoHUA), भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज अंतर्गत “निरोगी रस्ते, निरोगी शहरे, आनंदी जीवन” या उपक्रमाचा भाग म्हणून नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा केटीएचम कॉलेज च्या रावसाहेब थोरात हॉल येथील जागेत पार पडली.

                यावेळी ना.म्यु.स्मा.सि.डे.कॉ.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुमंत मोरे, महाव्यवस्थापक स्थापत्य दिग्विजय पाटील, महाव्यवस्थापक आयटी अनिल तडकोड, नाशिक रोझ सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. गुजराथी, श्रीमती अमिता पटवर्धन , सायबर सेक्यूरिटी साठी काम करणारी टीम “साक्षर ” चे प्रमुख प्रा. प्रवीण पाचोरकर व श्री प्रमोद पाटील, आणि इतर अधिकारी पदाधिकारी, स्मार्ट सिटी इंटर्न, शालेय विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

                  या स्पर्धेमध्ये शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. इयत्ता १ ते ३ पहिला गट , इयत्ता ४ ते ७ दुसरा आणि इयत्ता ८ ते १० तिसरा गट याप्रमाणे विद्यार्थ्यांचे तीन गटात वर्गीकरण करण्यात आले होते. “माझ्या कल्पनेतील नाशिक शहर” हा विषय चित्रकला स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेला होता. स्पर्धेमध्ये ११० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. प्रत्येक विद्यार्थ्याने उत्स्फूर्तपणे चित्रकला स्पर्धेत भाग घेऊन नाशिक शहराबद्दल त्यांना वाटणाऱ्या कल्पना चित्रकलेच्या माध्यमातून मांडल्या. 

                 यासोबतच स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी सुद्धा स्मार्ट सिटीच्या वतीने तिन वेगवेगळ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

                प्रथम कार्यशाळेमध्ये नाशिक रोझ सोसायटी च्या श्रीमती अमिता पटवर्धन यांनी ऑर्गेनिक किचन गार्डनिंग आणि बागकामाचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर होणारा परिणाम याबाबत पालकांना मार्गदर्शन केले.

                 द्वितीय कार्यशाळेमध्ये टीम “साक्षर” चे प्रमुख प्रा. प्रवीण पाचोरकर यांनी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर युट्युब इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर अधिक सुरक्षित रित्या करण्याबाबत मार्गदर्शन केले. टीम साक्षरच्या संपूर्ण टीम ने यावेळी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित पालकांना करून दिली.

                   तृतीय कार्यशाळेमध्ये नाशिक शहरातील हवामान बदलावर NIUA फेलोद्वारे माहिती देण्यात आली. यामध्ये नाशिकचे बदलत्या हवामानाविषयी आणि स्मार्ट सिटी अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या हवामान प्रकल्पांविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मार्ट सिटी चे इंटर्न विश्वजीत बोचरे आणि निकिता बंब यांनी केले.

                चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. शिवाय स्ट्रीट फॉर पीपल उपक्रमातील घेतल्या जाणाऱ्या सर्व कार्यक्रमातील विजेत्या विद्यार्थी आणि पालक यांचे बक्षीस वितरण येत्या ०२ ऑक्टोबर ला रामवाडी जवळील गोदा पार्क येथे करण्यात येणार आहे.

              शहरातील पायाभूत सुविधा विकास हा शास्वत विकासाचा पाया बनणे आणि त्यायोगे नागरिकांचे राहणीमान अधिकाधिक चांगले होणे ही काळाची गरज असल्याचे आणि स्मार्ट सिटी मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून हा उद्देश साध्य होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना स्मार्ट सिटी चे सीईओ सुमंत मोरे यांनी केले.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822117037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत