अन्य

नाशिकमध्ये आजपासून यिन कला महोत्सव

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

               नाशिक मध्ये दैनिक सकाळ समूहाच्या माध्यमातून नाशिक विभागीय यीन महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम खास करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, योग्य व्यासपीठ व करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा उपक्रम असून हा उपक्रम मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांचे रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादा भुसे, नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर आण्णा पाटील, दैनिक सकाळ समूहाचे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ.राहुल रनाळकर, अभिनेता चिन्मय उदगीकर, युवा ऊर्जा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.अमोल दिनकर पाटील या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

             या कार्यक्रमाची प्रस्तुती युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर पाटील व यीन असोशिएन विथ अपजेट अलमीरा ग्रोमिंग नेटवर्क मार्केटिंग व मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

              युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून अमोल दिनकर पाटील हे नेहमीच अशा सामाजिक तथा युवकांना रोजगार व करिअरच्या दृष्टीने उपयुक्त असे उपक्रम नाशिक मध्ये राबवली जातात. या कार्यक्रमाप्रसंगी उतर महाराष्ट्रातील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत