आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता
येत्या १५ दिवसांत शहरात ‘स्मार्ट’ वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा बसवली जाणार आहे. हि यंत्रणा पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत राबवली जाणार आहे. तसेच ‘अॅडॉप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ चा वापर करून ‘स्मार्ट सिग्नलिंग’ पद्धत शहरामध्ये सुरु केली जाणार आहे. तसेच सिंहगड रोडवरील स्मार्ट सिटी कार्यालयात एटीएम सिस्टिम साठी नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. हि नवीन सिस्टीम वाहनांच्या रहदारीच्या परिस्थितीनुसार रिअल-टाइम डेटावर काम करणार आहे. यासाठी ९५ ट्रॅफिक जंक्शनसाठी उपकरणे बसवण्याचे काम सुरु असून हे काम पूर्ण झाल्यावर एटीएमएसचा पहिला टप्पा होणार असल्याची माहिती पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी दिली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037