सुमित अग्रवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पुणे
पुणे पुनर्वसन कार्यालयातील घोटाळ्याच्या संदर्भात कृषी युवा संघटनेने आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले होते. महाराष्ट्र राज्य मदत व पुनर्वसन सचिव असीम गुप्ता यांनी केलेल्या चर्चेनंतर व पंधरा दिवसात कारवाई होईल या आश्वासनानंतर पुनर्वसन मधील भ्रष्ट अधिकारी व भुमाफीयांचे धाबे दणाणले आहेत. पुणे पुनर्वसन कार्यालयात झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात कृषी युवा संघटनेने आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले होते. पुणे पुनर्वसन कार्यालय हे फक्त भूमाफिया यांच्या सांगण्यावरून चालते, येथे मोक्याच्या ठिकाणी असणारे प्लॉट मिळवण्यासाठी स्पर्धा असते, जेव्हढा मोक्याचा प्लॉट तेव्हढी आर्थिक मलई जास्त मिळत असल्याने ती फाईल मंजूर केल्याने भूमाफिया व पुनर्वसन अधिकारी यांचे अर्थपूर्ण हितसंबंध दिसतात. मागील अधिवेशनात आमदार अशोक पवार यांनीही पुनर्वसन जमिनीच्या वाटपाबाबत विधान सभेत प्रश्न उपस्थित करून समिती नेमून चौकशी करायची मागणी केली होती. खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देखील आंदोलनाला भेट देऊन आपला प्रश्न लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037