अन्य

चांदोरी येथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी गोदावरी नदी पात्रात बुडाल्याची घटना

Spread the love

अनिस पटेल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , चाटोरी

                   सोमवारी सकाळी विद्यार्थी बुडाल्याची माहिती परिसरात समजताच आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बुडालेल्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यात येत आहे. रवींद्र बाळकृष्ण भोईर (20, रा. चाटोरी) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

              तो सायखेडा येथील महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो चाटोरी गावातील रहिवासी असल्याचे समजते. घटनास्थळी चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यरत असून सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस तसेच चांदोरीचे पोलीस पाटील अनिल गडाख, बाळू आंबेकर, अजय चारोस्कर, सोमनाथ कोटमे, मधुकर आवारे, संतोष लगड आदींचा या पथकात समावेश आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत