अन्य

जुलूस ए गौसिया उत्साहात साजरा

Spread the love

इम्रान अत्तार / उपसंपादक – दक्ष पोलिस वार्ता , नाशिक

                   जुने नासिक वडाळागाव नासिक रोड सिन्नर फाटा येथे नियाज जे गौस (अन्नदान ) दरवर्षी इस्लामी दिनदर्शिके प्रमाणे राबिऊल आखिर महिन्याच्या 11/ तारखेला हा सण ग्यारवी शरीफ म्हणून साजरा करण्यात येतो यानिमत्ताने शहरात विविध भागात नियाजे गौस (अन्नदानाचा ) कार्यक्रम शहरातील मशिदीला दर्ग्या वर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती दुपारी चार वाजता जुने नासिक मधील चौक मंडई येथून पारंपरिक पद्धतीने शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतुत्वाखाली मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी हून बडीदर्गा येथे पोहचुन शहर ए खतीब यांनी देशात अमन शांती जातीय सलोखा कायम राहावा या करिता प्रार्थना केली नायब शहर ए काजी एजाज सय्यद मौलाना शाकीर रजा मौलाना हाफिज अब्दुल जब्बार यांच्या सह मदरसा गौसे आजम मदरसा सादिककूल उलूम चे विध्यार्थी पारंपरिक पोशाखात उपस्तित होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत