अन्य

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे “उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” जाहिर

Spread the love

दानिश शेख / उपसंपादक , दक्ष पोलीस वार्ता, नाशिक

               नाशिक महानगरपालिका,शिक्षण विभागाचे सन 2022- 2023 या शैक्षणिक वर्षाकरीता” उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” ची निवड आज दिनाक 02/09/2022 रोजी जाहिर करण्यात आहे आहेत. प्राप्त शिक्षक प्रस्तावानुसार मा.शासनाच्या सुचनेनुसार गठीत केलेल्या ” उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मनपा प्राथमिक विभागातून 06 व खाजगी प्राथमिक शाळा 04 असे एकूण 10 शिक्षकांची ” उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” करीता निवड करण्यात आलेली आहे.

                     सदर ” उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” निवड समितीने शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करून मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल, स्थानिक सहभागातून उपक्रम सामाजिक कार्य , वैशिष्ट पूर्ण उपक्रम ,गुणवत्ता, विकासात संबधित वर्गाचे कामकाज, चाचणीचे निकाल गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न,वर्ग पातळीवरील उपक्रम,नवोपक्रम,कृति संशोधन, शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परिक्षा, विज्ञान प्रदर्शन व सहभाग, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेले प्रयत्न,राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग, कोविड -19 काळातील उपक्रम विद्यार्थी / शिक्षक ऑन लाईन शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केलेले प्रयत्न , स्वत:ची कार्यक्षमता टिकवून ठेवणे करिता केलेले प्रयत्न,उपक्रम व घेतलेले प्रशिक्षण लोक सहभागातून मिळविलेले साहित्य प्रकाशित लेख,पुस्तके,शोधनिबंध, प्रबंध, हस्तलिखिते या सर्व निकषांचा अभ्यास करुन शिक्षकांची” उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” साठी निवड करणेत आलेली आहे.

               उत्कृष्ट शिक्षक निवड करण्यासाठी ” उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” निवड समितीचे अध्यक्ष मा.डॉ.श्री.चंद्रकांतजी पुलकुंडवार सो. आयुक्त तथा प्रशासक ,नाशिक महानगरपालिका,नाशिक, निवड समितीचे उपाध्यक्ष मा.श्री.सुरेश खाडे, अति.आयुक्त,मनपा,नाशिक श्री.पी.बी.हिंगमिरे(सर) राज्य पुरस्कार विजेते शिक्षक,मा.श्रीम.मनिषा देवरे,प्राचार्य शासकिय डी.एड.महाविद्यालय तथा सदस्य निवड समिती व श्रीम.सुनिता धनगर, शिक्षणाधिकारी, तथा सदस्य सचिव मनपा शिक्षण विभाग,नाशिक यांनी काम पाहिले. सोबत उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारार्थीची यादी जोडलेली आहे.   

               सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षाकरीता “उकृष्ट शिक्षक पुरस्कार “विजेत्या शिक्षकांची यादी  मनपा प्राथमिक शाळा अ.न पुरस्कारार्थी शिक्षकांचे नाव पदनाम शाळा

1. श्रीम.माळी छाया नामदेव प्र.मुख्याध्यापिका शाळा क्र..67

शिवाजी वाडी

2. सौ.ठोके वैशाली नितिन

मुख्याध्यापिका

शाळा.क्र.78,अंबड

3.श्रीम.दाते कमल कांतीलाल
उपशिक्षिका

शाळा.क्र.03 नांदूर

4.सौ.चव्हाण रुपाली महेंद्र
उपशिक्षिका

शाळा क्र.77 अंबड

5.श्री.जाधव महेंद्र नारायण
उपशिक्षक

शाळा क्र.74, जाधव संकूल

6.श्रीम.सोनवणे गायत्री
उपशिक्षिका

शाळा क्र.10 पंचवटी

खाजगी प्राथमिक शाळा 
अ.न
पुरस्कारार्थी शिक्षकांचे नाव

पदनाम

शाळा

1.तिवारी निलेश गौरीशंकर
उपशिक्षिक

मॉडर्न एज्यूकेशन सोसा,प्राथमिक विद्यालय ,अशोक नगर

2.सौ.कराड कल्पना अनिल
मुख्याध्यापिका

नुतन मराठी प्राथमिक शाळा

3.श्री.पाटील नितिन जिभाउ
मुख्याध्यापक

सुकदेव प्रा.मराठी विद्यामंदिर , इंदिरा नगर

4.सौ.कुलकर्णी सविता पांडूरंग
उपशिक्षिका

नवीन मराठी शाळा, ना.रोड

(सुनिता धनगर)                        

शिक्षणाधिकारी

मनपा शिक्षण विभाग, नाशिक

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत