अन्य

चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Spread the love

जोहरान पठाण / विभागीय संपादक , दक्ष पोलीस वार्ता, नाशिक

डॉ. संगीता बाफना यांचा आज मुंबई येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक पुरस्काराने झाला सन्मान. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य डॉ सौ संगीता राजेंद्र बाफना यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा अतिशय मानाचा राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२१-२२ प्रदान करण्यात आला.

                  श्री नेमिनाथ माध्यमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य आपल्या विद्यालयात प्राचार्य हे पद सांभाळत नवनवीन संकल्पनांना आणि प्रयोग यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देत विद्यालयाच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत असतात. तसेच विद्याल्यातील शिक्षकांच्या मदतीने ज्ञानरचनावादी अध्यापनाच्या व्यवस्थापनातून क्रांतिकरक बदल घडवून आणला आहे. त्याचप्रमाणे संगीता बाफना या शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही हिरीरीने सहभागी होत असतात. महावीर इंटरनॅशनल नाशिक, वसंत व्याख्यानमाला यांच्या अंतर्गत समाजसेवेत कार्यरत आहेत.

                  प्राचार्य संगीता बाफना यांच्या कामाची पावती म्हणून त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदावर आपली सेवा बजावताना दिसत आहेत. विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या आणि आपल्या अलौकिक कामाची दाखल घेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२१-२२ प्रदान करण्यात आला आहे.

             या नेत्रदिपक आणि अभिमानस्पद समारंभास मा.ना. श्री. दिपक केसरकर मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे विशेष उपस्थितीत, मा. ना. श्री. मंगलप्रभात लोढा मंत्री, पर्यटन, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास. विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच मा. शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, मा.श्री. सूरज मांढरे (भा.प्र.से.) आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, मा.श्री. कृष्णकुमार पाटील शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य आणि मा.श्री. शरद गोसावी शिक्षक संचालक ( प्राथमिक) महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

                विद्यालयाच्या प्राचार्य यांच्या पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती उपाध्यक्ष दिनेश लोढा प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा उपाध्यक्ष अरविंद भन्साळी मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलीझाड, महावीर पारख यांनी शुभेच्छा दिल्या.

                तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य संदिप समदडीया, पर्यवेक्षक रविंद्र पवार यांच्यासह विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी तसेच संस्थेतील सर्वच घटकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत