दिनेश गोसावी / संपादक – दक्ष पोलीस वार्ता न्यूज (पिंपळगाव बसवंत)
निफाड तालुक्यात ढगाळ वातावरनामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून द्राक्ष निर्यातीसाठी आवश्यक असणारे शेतकऱ्यांचे फोर बी फॉर्म भरून घेण्याचे निर्देश माजी आमदार अनिल कदम यांनी तालुका कृषी अधिकारी आण्णासाहेब गागरे यांना दिले. तसेच अवकाळी पावसामुळे द्राक्ष घडांना तडे जाणाची शक्यता असल्याचे बागांना पाणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्याशी चर्चा करुन निफाड तालुक्यातील व पिंपळगाव परिसरातील सतरा रोहित्र तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे.
शेतकरी बांधवांसाठी द्राक्ष एक्सपोर्ट साठी ४ बीचे फॉर्मची आवश्यकता असते. निफाड तालुक्यात तसेच नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात ज्या शेतकरी बांधवांचे द्राक्ष बागा एक्सपोर्टसाठी तयार असून सर्व कृषी सहाय्यक कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे शेतकरी बांधवांना ४ बी फॉर्म उपलब्ध होत नव्हते. निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्यांनी मा.आमदार अनिल कदम यांच्याकडे याबाबत तक्रार केली असता त्यांनी तत्काळ तालुका कृषी अधिकारी आण्णासाहेब गागरे यांना ४ बी फॉर्म शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गागरे यांनी संपकाळातही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ४ बी फॉर्म उपलब्ध करूण देण्याचे लेखी परीपत्रक कृषी सहाय्यक यांना काढले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बागांना पाणी देण्यासाठी तातडीने रोहित्र देण्याची मागणी केली होती त्याचीही दखल अनिल कदम यांनी घेत तालुक्यात जळालेले सर्व रोहित्र तातडीने देण्याबाबत अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्याशी चर्चा केली. त्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन पडळकर यांनी अनिल कदम यांना दिले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037