दिनेश गोसावी / संपादक – दक्ष पोलीस वार्ता
गेल्या दीड वर्षापासून नगरपरिषद जाहीर झाल्यानंतर गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कचरा व्यवस्थापन व वाढलेली ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ठीक या सर्व बाबी लक्षात घेत राजकीय संघटनांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिली. परंतु कोणत्याही प्रकारची वाचा न फुटल्याने ओझर व परिसरातील दुर्गंधीचे प्रमाण वाढले होते. हीच बाब लक्षात घेत माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नातून ओझर व परिसरातील नागरिकांच्या सेवेत पाच अत्याधुनिक घंटागाड्या 13 मार्च सोमवार रोजी नगरपरिषदेला सुपूर्त करण्यात आले असून ओझर व उपनगरांमधील झालेल्या रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेत ओझर मधील विविध रस्ते, स्ट्रीट लाईट या विकास कामांचा शुभारंभ १४ मार्चपासून सुरू होणार असल्याचे यावेळी अनिल कदम यांनी सांगितले. ओझर परिषदेस शहरातील घनकचरा व्यवस्थांकरिता पन्नास लक्ष रुपयांच्या पाच घंटागाड्याचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी किरण देशमुख, माजी आमदार अनिल कदम, प्रभाकर आढाव,राजेंद्र शिंदे, प्रशांत पगार, सुनिल कदम, शामराव कदम, नितीन काळे, प्रकाश महाले, महेश गाडगे, असं पगार भारत पगार, हेमंत जाधव, धर्मेंद्र जाधव, दिलीप लढ्ढा, दिपक सिरसाठ, संजय पगार, भास्कर मामा शिंदे, अनिल सोमासे, आशिष शिंदे, महेश शेजवळ आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037