सौरभ कामडी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , मोखाडा
शेतीची प्रथा ही आपण पुरातून काळामध्ये योग्य रीतीने करत आलेली आहे. ती एक नैसर्गिक रित्या आपल्याला भेटलेली देणगी आहे असे बोलायला वावगे जाणार नाही आणि ती आपण वेगवेगळ्या पद्धतीने रितीनुसार करत असतो तसेच ऋतु प्रमाणे करत असतो आणि योग्य पद्धतीने वातावरणानुसार त्याचे आपण लागवड करून त्याचा लाभ घेत असतो पण ती शेती करत असताना कशी करावी कोणत्या पद्धतीने करावी या मधील आपणास काही गोष्टी ठाऊक नसतात मग त्या कोणत्या पद्धतीने कराव्यात त्याचे मार्गदर्शन आपण विविध मार्गाने घेत असतो असेच
आज वाकडपाडा येथील घुटकेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की ASK फाउंडेशन,बायफ संस्था व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने परीसराती शेतकऱ्यांना 2019 पासून मार्गदर्शन करुन, त्यांना आधुनिक शेती कडे प्रवृत्त केले व त्यांची आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला हे खुप सुंदर कार्य केले आहे असं मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी देखील पंरपरा गत शेती बरोबर आधुनिक शेती कडे लक्ष द्या,असे आवाहन देखील श्री प्रदीप वाघ यांनी शेतकरी बांधवांना केले.
बायफ संस्था,ASk फाउंडेशन ने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी विविध पिके घेण्यासाठी मार्गदर्शन केले त्यामुळे स्टाॅबेरी, मधमाशी पालन,भाजी पाला अशा विविध नवीन शेती कडे शेतकरी वळले असुन त्यांना रोज चांगला बाजारभाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी आंनदात आहेत. या मेळाव्याचे आयोजन ASK फाउंडेशन,बायफ संस्था यांनी केले होते,
यावेळी श्री प्रदीप वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ कुसुम झोले, सौ आशा झुगरे पंचायत समिती सदस्या, सरपंच श्री नरेंद्र येले, सरपंच दिलीप झुगरे तालुका कृषी अधिकारी श्री पारधी, डॉ कैलास आंधळे , शिवाजी आदमाने , श्री दिनेश महाले, दिपक नजन, विवेक गोतरणे, अनिल पालवे, उपसरपंच श्री हनुमंत पादीर,माजी सरपंच श्री पांडुरंग कातवारे, रमेश घाटाळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आदिवासी नृत्य सादर करण्यात आली,टारपा, ढोल नाच, शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य सादर केले. यावेळी शेतकरयांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आयोजन श्री प्रशांत बोराडे बायफ संस्था प्रकल्प मॅनेजर यांनी केले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037