अन्य

आईच बनली वैरीण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आईसह आरोपीला अटक

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज,नाशिक

              अहमदनगर जिल्ह्यातील राहता पोलिस स्टेशनमध्ये एक खळबळजनक आणि तितकीच संतापजनक असलेल्या घटनेची फिर्याद दाखल झाली असून फिर्यादी हा मुलीचा मामेभाऊ असून त्याने मुलीच्या सांगण्यावरून मुलीच्या आई विरुद्ध आणि इतर एका आरोपी विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. 

               याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, कोपरगांव तालुक्यातील शिक्षण घेणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला चक्क तिच्या जन्मदात्या आईनेच सांगितले की, तुला आरोपी नामे आबासाहेब रामचंद्र भडांगे ( रा. वेस, ता.कोपरगाव ) याच्यासोबत झोपावे लागेल, आईच्या या अजब आदेशाला शिक्षण घेत असलेल्या मुलीने ठामपणे विरोध करत स्पष्ट नकार दिला. मुलीने नकार देताच आईने मुलीला धमकावत आपल्या समाजात हि प्रथा असल्याने असे तुला करावेच लागेल, तू जर असे केले नाही तर तुझ्याकडे पहावे लागेल असे म्हणत चक्क बळजबरीने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीला आबासाहेब रामचंद्र भडांगे नावाच्या इसमाच्या ताब्यात दिले व ती अल्पवयीन असल्याची माहिती असून सुद्धा तिच्या इच्छेविरुद्ध घरातील एका खोलीत नेऊन आरोपीने दुष्कृत्य केल्याची संतापजनक घटना घडल्याने कोपरगाव तालुक्यासह राहता परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

            याबाबत पीडित मुलीच्या वतीने तिचा मामेभाऊ याने राहता पोलिस स्टेशनला १६ सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल केली असून आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर४०७/२०२२ भादवी कलम ३७६ (२)( i )( j ), ५०६,३४ बालकांचे लैंगिक शोषण संरक्षण अधिनियम कायदा कलम ४,६,१६,१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून. आरोपी आबासाहेब रामचंद्र भडांगे आणि मुलीची आई दोघांना अटक करण्यात आली असून घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधीक्षक संजय सातव यांनी भेट दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड हे करीत आहेत.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत