आनंद बंसल/प्रतिनिधि दक्ष पोलिस वार्ता पुणे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हरेश्वर नगर परिसरातील वृंदावन अपार्टमेंटमधील रहिवासी ललना चंद्रमोहन टेमकर 58 या रविवार 2 जुलै रोजी रात्री सव्वाआठ वाजता अपार्टमेंटसमोर उभ्या असताना पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी धूम स्टाईल येत महिलेच्या गळ्यातील 23 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अलगद लांबवली. महिलेने आरडा-ओरड केली मात्र तो पर्यंत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी टेमकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड करीत आहेत.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037