अन्य

काळ्या बाजारात विकला जाणारा रेशनचा तांदूळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडला

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक

                शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांनी काळ्या बाजारात विकल जाणारा हजारो किलो तांदूळ सिनेस्टाईल पकडल्याने सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

                     एम.एच-१५, ई.एच.-३३२६ ही रिक्षा १० ते १२ तांदळाच्या गोण्या घेऊन जात असताना सिडको परिसरात शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या शिताफिने पकडली. यासंदर्भात श्री. बडगुजर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी महोदय यांच्या कानावर सदर बाब टाकली. जिल्हा पुरवठा कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तांदळाच्या गोण्यांनी भरलेली रिक्षा व रिक्षा चालकाला ताब्यात घेतले व जागीच पंचनामा केला. पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी पंचवटीत राहणारा रिक्षा चालक अर्जून स्वामी याची कसून चौकशी केली, परंतु त्याने संबंधित रेशन दुकानदाराचे नाव मात्र काहीं करता सांगितले नाही. या संदर्भात पुढील कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस करणार आहेत. 

                    शिवसेनेचे पंकज जाधव, नाना पाटील, सुभाष गायधनी, अविनाश काकडे, दिग्विजय सोनवणे, कुणाल सोनवणे आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर रिक्षा, तांदळाच्या गोण्या व रिक्षा चालकास पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासंदर्भात रेशन ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

                शासनाच्या वतीने गोरगरिबांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले धान्य हे सर्रासपणे काळ्या बाजारात विकले जात असल्याची बाब शिवसेना कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी सदर माल पकडून दिला. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले असता त्यांनी पंचनामा केला. केवळ रिक्षा चालकावर कारवाई न करता संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई होणे अपेक्षित आहे. 

– सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगरप्रमुख

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत