अन्य

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एन एम एम एस परीक्षेत उत्तुंग यश

Spread the love

गणेश बत्तासे/ प्रतिनिधी-दक्ष पोलिस वार्ता, कोपरगांव 

              कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मौजे सुरेगाव, कोळपेवाडी विद्यालयातील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ( NMMS) 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यामध्ये मुटकुळे पवन संभाजी, वाडेकर वैभव अतुल आणि हजारे अभिजीत रामेश्वर हे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. वरील विद्यार्थ्यांना NMMS प्रमुख श्री नंदनवार व्ही. आर. आणि विषय शिक्षक श्री खाडे जी. एच,श्रीमती विखे जी.एस, आणि श्री सोनवणे पी. एस. यांनी मार्गदर्शन केले.

             या उज्वल यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री चौरे पी. बी, पर्यवेक्षक श्री तुपे एस.एम, श्री कुदळे एल. आर, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

साजिद शेख 

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत