अन्य

मविप्र’त ‘परीवर्तन’ ; ॲड. नितीन ठाकरे यांच्या पॅनलची सरशी तर प्रगती पॅनलचा धुव्वा

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक

               रयत शिक्षण संस्थेनंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अखेर परिवर्तनच्या दिशेने मतदारांनी कौल दिला असून अ‍ॅड.नितीन ठाकरे यांच्या पॅनलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी झाले. तर सत्ताधारी श्रीमती. नीलिमाताई पवार यांच्या प्रगती पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. सुनील ढिकले सोडल्यास सर्वच उमेदवारांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत सर्वाधिक महत्त्वाच्या असणा-या सरचिटणीसपदाच्या जागेवर अ‍ॅड.नितीन ठाकरे यांनी ५ हजार ३९६ मते मिळवत विजय मिळवला तर नीलिमाताई पवार यांना ४ हजार १३८ मते मिळाली. १२५८ मतांची आघाडी घेत ठाकरे यांनी मागील पराभवाचा वचपा काढल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी असलेले परिवर्तन पॅनलेचे उमेदवार आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत रात्री उशीरापर्यंत काही जागेसाठी फेरमतमोजणी सुध्दा सुरु होती. त्यामुळे एखादा निकाल बदलण्याची शक्यता आहे. फेरमतमोजणीमुळे अधिकृत निकाल अद्याप आलेला नसला तरी कल स्पष्ट झाला आहे.

              सत्ताधारी प्रगती पॅनलच्या नीलिमाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांच्या गतीला नाराजीचा ब्रेक बसणार असल्याचे संकेत मतदारांकडून मिळत होते. त्यात या निवडणुकीत नाती गोती, संबध, राजकीय नेत्यांची भूमिका, वाढलेले मतदार या गोष्टीचा परिणाम झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. बदल्यामुळे कर्मचा-यांचा राग सत्ताधारी पॅनल विरोधात दिसून आला. 

                 या निवडणुकीत नीलिमाताई पवार यांच्या सत्ताधारी गटाला मतदारांच्या नाराजीची जाणिव अगोदरच झाल्यामुळे त्यांनी सुद्धा कंबर कसली होती. ती दूर करण्याच्या दिशेने त्यांनी अनेक पाऊल उचलली. त्यासाठी जोरदार प्रयत्नही केले. परंतु तरी देखील संपूर्ण नाराजी दूर करण्यात त्यांना यश आले नाही. तर दुसरीकडे अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनल ‘काँटे की टक्कर’ दिली. गेल्या निवडणुकीत अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या पॅनलचा निसटता पराभव झाला होता. पण, त्यानंतर त्यांनी पाच वर्ष सातत्याने मतदारांशी ठेवलेला संपर्क व त्याचबरोबर संस्थेच्या कामावर ठेवलेली करडी नजर त्यांना या निवडणुकीत फायदा देऊन गेली. गेल्या निवडणुकीत त्यांचे पॅनल कमकुवत होते, पण यावेळेस अनेक दिग्गज त्यांच्या पॅनलमध्ये असल्यामुळे त्यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. या निवडणुकीत माजी सरचिटणीस कै. डॉ. वसंतराव पवार यांचे सख्खे दाजी श्री.डी.बी. मोगल हे ठाकरे यांच्या पॅनलमधून उपसभापती झाले. 

हा कर्मवीरांच्या विचारांचा विजय

             हा कर्मवीरांच्या विचारांचा विजय असून गेल्या पाच वर्षापासून संस्थेत सुरू असलेला मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार तीन सरचिटणीसांचं सरकार आणि कर्मचाऱ्यांवर होणारा अत्याचार हा मोठ्या प्रमाणावर फोफावला होता. सभासदांनी ही निवडणूक हातात घेतली होती. झालेला विजय माझा नसून सर्वांचा आहे. संस्था कशी उंच भरारी घेईल हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन काम करेल. उतणार नाही मातणार नाही आणि घेतलेला वसा टाकणार नाही.

ॲड.नितीन बाबुराव ठाकरे नवनिर्वाचित सरचिटणीस, मविप्र, नाशिक 

हे आहेत विजयी उमेदवार

अध्यक्ष-

डॉ. सुनील उत्तमराव ढिकले (प्रगती) – (विजयी)

ॲड.कोकाटे माणिकराव शिवाजीराव (परिवर्तन)

उपाध्यक्ष

मोरे विश्वास बापूराव (परिवर्तन) – (विजयी)

दिलीप तुकाराम मोरे(प्रगती)

सभापती-

*क्षीरसागर बाळासाहेब रामनाथ (परिवर्तन) – (विजयी)

माणिकराव माधवराव बोरस्ते(प्रगती)

उपसभापती-

मोगल देवराम बाबुराव (परिवर्तन) -(विजयी)

डॉ. विलास केदा बच्छाव(प्रगती)

सरचिटणीस-

ॲड. ठाकरे नितीन बाबुराव (परिवर्तन) – (विजयी)

नीलिमाताई वसंतराव पवार(प्रगती)

चिटणीस-

दळवी दिलीप सखाराम (परिवर्तन) – (विजयी)

डॉ. प्रशांत पाटील(प्रगती)

तालुका प्रतिनिधी

नाशिक ग्रामीण-

पिंगळे रमेश पांडुरंग (परिवर्तन) – (विजयी)

सचिन पंडितराव पिंगळे(प्रगती)

येवला

बनकर नंदकुमार बालाजी (परिवर्तन) – (विजयी)

माणिकराव माधवराव शिंदे(प्रगती)

सिन्नर

भगत कृष्णाजी गणपत (परिवर्तन) – (विजयी)

हेमंत विठ्ठलराव वाजे(प्रगती)

मालेगाव-

ॲड. बच्छाव रमेशचंद्र काशिनाथ (परिवर्तन) – (विजयी)

डॉ. जयंत पवार(प्रगती)

देवळा

पगार विजय पोपटराव (परिवर्तन) – (विजयी)

केदाजी तानाजी आहेर(प्रगती)

चांदवड-

डॉ. गायकवाड सयाजीराव नारायणराव (परिवर्तन) -(विजयी)

उत्तमबाबा भालेराव(प्रगती)

नांदगाव-

पाटील (बोरसे) अमित उमेदसिंग (परिवर्तन) – (विजयी)

चेतन मनसुखराव पाटील(प्रगती)

सटाणा-

प्रसाद सोनवणे (परिवर्तन) – (विजयी)

विशाल सोनवणे(प्रगती)

नाशिक शहर-

लांडगे लक्ष्मण फकिरा (परिवर्तन) – (विजयी)

नानासाहेब महाले(प्रगती)

निफाड

गडाख शिवाजी जयराम (परिवर्तन) – (विजयी)

दत्तात्रय निवृत्ती गडाख(प्रगती)

दिंडोरी-

जाधव प्रवीण एकनाथ (परिवर्तन) – (विजयी)

सुरेश कळमकर (प्रगती)

कळवण-

देवरे रवींद्र शंकर (परिवर्तन) – (विजयी)

धनजंय पवार (प्रगती)

इगतपुरी-

गुळवे संदीप गोपाळराव (परिवर्तन) – (विजयी)

भाऊसाहेब खताळे (प्रगती)

महिला राखीव गट

१) बोरस्ते शोभा भागवत -(विजयी) – परिवर्तन

२) सोनवणे शालन अरुण -(विजयी) -परिवर्तन

३)सिंधुताई मोहनराव आढाव

४) सरला गुलाबराव कापडणीस

सेवक संचालक

संजय खंडेराव शिंदे (सेवक) – (विजयी)

डॉ. संपतराव काळे

इंद्रजित दयाराम शिंदे – (सेवक) – (विजयी)

रामराव बच्छाव

जगन्नाथ मधुकर निंबाळकर (सेवक)- (विजयी)

राजेश शिंदे

साजिद शेख 

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822117037 / +919822817037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत