अन्य

स्थानिक नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई , वांद्रे येथील प्रमुख रिझवी बिल्डरचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

Spread the love

साजीद शेख /मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता 

             वांद्रे येथील स्थानिक रहिवाशाच्या तक्रारीनुसार, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जुलै २०२२ मध्ये श्री अख्तर हसन रिझवी, श्रीमती मीना अख्तर रिझवी, रेश्मा अख्तर रिझवी या रिझवी इस्टेट्स अँड हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक च्या विरोधात आणि श्री सुहास वसंत वेंगुर्लेकर वाकोला पोलिस ठाण्यात एफ.आय.आर. दाखल केले आणि ते कलम ४०९/४२०/३४ सह 3, 4, 8, 13 अन्वये आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. दरम्यानच्या काळात एक आरोपी श्री अख्तर हसन रिझवी यांनी जून 2022 मध्ये अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सन्माननीय सत्र न्यायालय ७ जानेवारी २०२३ रोजी कोणतीही तडजोड आणि अटी शर्त ती शिवाय उपरोक्त अर्ज फेटाळला गेला आहे. दरम्यान पोलिसांची दिशाभूल करून हा आरोपी भारतातून पळून गेला आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत