आनंद अगरवाल / प्रतिनिधि – दक्ष पोलिस वार्ता
मा.पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे साो, नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते. भद्रकाली पोलीस स्टेशन गु.र.नं. १९९/२०१९ भा.द.वि. कलम ३७९, ३४ मधील crpc २९९ प्रमाणे फरार आरोपी जसवंत उर्फ रितीक चव्हाण हा कावेरी हॉटेल व्दारका जवळ, नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी गुप्त बातमीदारा मार्फत खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार पोलीस | नाईक ९११ चकोर व पोलीस अंमलदार २३९२ जुंद्रे यांना मिळाली होती.
त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावुन पाहिजे आरोपी जसवंत उर्फे | रितीक सरणपाल चव्हाण, वय २३ वर्षे, व्यवसाय- मटन दुकान, रा. वाल्मीक मंदिराजवळ महालक्ष्मी चाळ, वडाळानाका, | नाशिक यास दि. १४/०८/२०२३ रोजी कावेरी हॉटेल व्दारका जवळ, नाशिक येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील तपास व कारवाई कामी भ्रदकाली पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त सो. नाशिक, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे, मा. श्री. डॉ. सिताराम कोल्हे, सपोआ गुन्हे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील पोनि. विदयासागर श्रीमनवार, सपोनि. प्रविण सुर्यवंशी, श्रेपोउनि. दिलीप भोई, सपोउनि. दिलीप सगळे, पो. हवा. किशोर रोकडे, पो.ना. योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर पो. अंमलदार स्वप्नील जुंद्रे, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, विठ्ठल चव्हाण, चारूदत्त निकम व मपोशि. सविता कदम यांनी केलेली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037