सूर्यकांत चिकणे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता
बार्शी तालुक्यातील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 25%अग्रीम विमा तात्काळ मंजूर करावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा भैरवनाथ शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे यांनी दिला आहे. बार्शी तालुक्यात सलग 21 दिवसा पेक्षा जास्त दिवस झालेत पाऊस पडला नाही म्हणुन पिक विमा कंपनीच्या नियमानुसार पाऊस पडलेला नाही तरी या नियमानुसार तरी महसूल, कृषी, विमा कंपनी यांनी संयुक्त पंचनामे शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन करावे व आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रीम विमा रक्कम तात्काळ जमा करावी अन्यथा गुळपोळीतील एस टी स्टॅन्डवर बार्शी मोहोळ रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन तहसीलदार यांना सूर्यकांत चिकणे यांनी दिले आहे सदर निवेदनावर सूर्यकांत चिकणे,शहाजी चिकणे, अतुल चिकणे, तुकाराम चिकणे, विनायक चिकणे, रेखा चिकणे, नागेश बारवकर, रामचंद्र चिकणे यांच्या सह्या आहेत.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037