अन्य

दिंडोरी तालुक्यातील निळवंडी गावातील जवानाचा लडाखमध्ये मृत्यू

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

               दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील सैन्यदलातील जवान आदित्य अशोक जाधव यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून, याबाबत संबंधित विभागाकडून दूरध्वनीद्वारे त्यांचे नातेवाईक व पोलिसपाटील यांना माहिती प्राप्त झाली आहे.

            मात्र, शासकीय यंत्रणेकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे दिंडोरी तालुक्यावर तसेच परिसरात शोककळा पसरली आहे. निळवंडी येथील जवान आदित्य जाधव हे लडाख येथे सैन्यदलात कार्यरत होते. त्याचा मृत्यू झाल्याची माहिती संबंधित विभागाकडून दूरध्वनीद्वारे नातेवाईक व पोलिसपाटील यांना प्राप्त झाली आहे. याबाबत शासकीय यंत्रणा यांच्याशी संपर्क साधला असता अधिकृत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. तसेच त्याचा मृत्यू कसा झाला याबाबतही माहिती मिळालेली नाही.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत