प्रशांत वांगड/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,जव्हार
पालघर जिल्हा संगणकपरिचालक संघटनेने निवेदन देऊन प्रश्न मांडला! महाराष्ट्र राज्यातील सुमारे 29 हजार ग्रामपंचायत मध्ये मागील 11 वर्षापासून कार्यरत असलेल्या संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशी नुसार ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे या प्रमुख मागणी साठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर नुकतेच आंदोलन संपन्न झाले,त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला तर ग्रामविकासमंत्री ना.गिरीशजी महाजन साहेबानी लेखी आश्वासण दिले आहे,याचाच एक भाग म्हणू पालघर जिल्हा संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने देशाचे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री ना.कपीलजी पाटील यांची भेट घेऊन त्यांना संघटनेचे निवेदन दिले तसेच हा प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी केली,त्यावर ना.पाटील यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकासमंत्री ना.गिरीशजी महाजन यांना बोलून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना.पाटील यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला बोलताना सांगितले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037