अन्य राष्ट्रीय

चाळीसगावला आरटीओ नंबर आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगावला आरटीओ विभाग उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर

Spread the love

प्रशांत जोशी / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता, उंबरखेड

चाळीसगावकरांच्या दोनशे किमी जळगाव फेरा वाचणार आता चाळीसगावला आरटीओ कार्यालय जळगावचे हेलपटा थांबणार . येथे आरटीओ कार्यालय व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती ही मागणी फलद्रूप होण्याच्या मार्गावर आहे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री परिवहन आयुक्तांकडे पाठपुरवठा केला होता हे कार्यालय झाल्यास चाळीसगाव ते जळगाव हा येऊन जाऊन 200 किलोमीटरचा फेरा वाचणार आहे चाळीसगाव आता स्वतःच्या आरटीओ नंबर असेल. चाळीसगाव तालुक्याचे क्षेत्र हे 35 ते 40 किलोमीटर असून ग्रामीण भागातील वाहन चालकांना वाहन फिटनेस जुने वाहन नावावर करणे जुने लायसन नूतनीकरण करणे नवीन वाहनांची परमिट काढणे नवीन वाहन पासिंग व नूतनीकरण करणे असे अवजड किंवा मालवाहू वाहनांना कर भरण्यासाठी जळगाव गाठावे लागते . चाळीसगाव लागून भडगाव 30 किमी पाचोरा 45 किमी पारोळा 42 किमी हे तालुके जवळ असून या परिक्षेत्रातून आरटीओ विभागाला जवळपास चार ते साडेचार कोटी रुपयांचा महसूल मिळतो तात्कालीन सरकारच्या काळात भुसावल येथे आरटीओ कार्यालय व्हावे यासाठी प्रयत्न झाले होते मात्र जेव्हा हा प्रस्ताव वगळण्यात आला आमदार मंगेश चव्हाण यांनी दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री व परिवहन आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरवठा केला होता मात्र स्वतंत्र जिल्हा झाल्यावरच नवीन कार्यालयाची निर्मिती शक्य असल्याचे शासनाने कळविले होते . पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्र देऊन नव्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती चाळीसगाव तालुक्यात हा जिल्हा तीन क्रमांकाचा तालुका असून भडगाव पाचोरा पारोळा जवळ आहे तसेच छत्रपती संभाजी नगर धुळे नाशिक या तीन जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने दरवर्षी अनेक वाहने नोंदणी कृत्य होतात तसेच वाहन चालविण्यासाठी परवाना काढण्याची संख्या देखील मोठी आहे. तसेच चाळीसगाव सह पाचोरा भडगाव पारोळा येथे वर्षभरातून वाहन नोंदणीसाठी व वाहन चालवण्याच्या परवाना काढण्यासाठी कॅम्प घेतले जातात त्यामुळे शासनावर आर्थिक भार पडतो नागरिकांनी कॅम्पच्या दिवशी जाणे शक्य होत नाही. ही गैरसोय लक्षात घेता चाळीसगाव येथे नागरिकांची आरटीओ कार्यालय असावे अशी मागणी आहे गृह विभागाने गतवर्षी जळगाव येथून उपप्रादेशिक कार्यालयाचा दर्जा काढून प्रादेशिक परिवहन कार्यालय रूपांतर केले. सध्या हे कार्यालय जिल्ह्यात एकमेव कार्यालया असून जिल्ह्याच्या सर्व भार या कार्यालयावर पडतो त्यामुळे चाळीसगाव येथे उपप्रादेशिक कार्यालय त्वरित सुरू करण्यासंबंधी आदेश करावे अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली होती त्यावर मुख्यमंत्री परिवहन विभागाचा प्रधान सचिवांना तात्काळ मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निरीक्षण दिले होते त्यामुळे चाळीसगाव येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय झाल्यास वाहनधारकांची जळगावला जाण्याची येलपटा थांबणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत