राजेंद्र कोल्हे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता, चांदवड
चांदवड शहरातील मेनरोड व अन्य रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अाहिरे यांच्या वतीने *चांदवड शहरातील शिवाजी चौक, मेनरोड, बाजारवेश, कॉलेज रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड व ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले* व या आशयाचे *१०७० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असणारे निवेदन* उप – विभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना दि.२५ नोव्हेंबर २०२२ रोजी देण्यात आले व प्रत माहितीसाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, चांदवड – देवळा तालुक्याचे आमदार यांना देण्यात आले.
चांदवड शहरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली असून शहरातील मेनरोड, सोमवार पेठ व बाजारवेशेतील रस्त्यांची तर अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. मेनरोड व सोमवार पेठ हे शहरातील अत्यंत वर्दळीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे या रस्त्यांची चाळण झालेली आहे. तसेच शहरातील बाजारपेठ, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर रोड, होळकर शाळा रोड, मर्चंट कॉलनी रोड, शर्मा कॉलनी रोड, श्रीराम रोड, शिवनेरी चौक, गुजराथ गल्ली रोड, पोस्ट ऑफिस – साखळीवाडा रोड, उर्दू शाळा रोड, जनता शाळेच्या मागचा रोड, लोहार गल्ली रोड, डांबर विहीर रोड, कुंभार गल्ली रोड, शिंपी गल्ली रोड, बागवानपुरा, वरचे गाव, पंचशील नगर, हनुमाननगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील बुद्ध विहाराच्या मागचा रोड, सिद्धार्थनगर, कालिका माता रोड, बागुल गल्ली रोड, जुनी कोर्ट गल्ली रोड, स्वामी समर्थ रोड, गोसावी वाडा, मातंग वाडा, रोहिदास नगर, जैन मंदिर रोड, हमाल – मापारी कॉलनी, रंगमहाल समोरील रोड, शनि मंदिर रोड, खोकड तलाव रोड, संत गाडगेबाबा चौक, लेंडी हट्टी रोड, बुखारी बाबा रोड, चिंचवन, आसुरी रोड, मुल्लावाडा, नानावली बाबा मज्जिद रोड, कॉलेज रोड, कोर्टाजवळ, भैरवनाथ कॉलनी, गणेश कॉलनी, गुजराथी नगर, डावखर नगर, म. फुलेनगर व सर्व कॉलनी रोड या रस्त्यांची देखील अत्यंत दुरावस्था झालेली आहे. चांदवड शहरातील सर्व रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. या रस्त्यांवर तसेच बाजारवेशेत देखील ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे नेहमी छोटे – मोठे अपघात घडत असतात. या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना अडथळे निर्माण होतात. खड्ड्यांमुळे दुचाकी वाहने स्लीप होतात व चालकांचे छोटे-मोठे अपघात होतात व त्यांना इजा होते. या खड्ड्यांमुळे लोकांचे कंबर, पाठ, मणके निकामी झालेले आहेत. अनेकांचे हात – पाय फ्रॅक्चर झालेले आहेत व काही लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत. पावसाळ्यात सुद्धा या खड्ड्यांमुळे रस्त्याने नीट चालता येत नव्हते. रस्त्यांतील स्टील व गज वर आलेले आहेत. या गजांमध्ये पाय अडकून नागरिक, लहान मुले खाली पडतात व जखमी होतात. या गजांची ठेच देखील लागते.
लोकांना चालण्यासाठीही रस्ता नसल्याने शहरातील सर्व नागरिक संतप्त झालेले आहेत. या रस्त्यांवर नेहमी किरकोळ अपघात होत असतात. तरीदेखील नगरपरिषदेने झोपेचे सोंग घेतलेले आहे. शहरातील मेनरोड चे काम ग्रामपंचायतच्या अधिपत्यात करण्यात आलेले होते. त्यानंतर ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपरिषद झाले. पण, गेल्या ७ ते ८ वर्षांत नगरपरिषदेने शून्य टक्के कामे केलेली आहेत. मागील ७ ते ८ वर्षांपासून जशी नगरपरिषद झाली तेव्हापासून ते आत्तापर्यंत चांदवड शहरात एकही विकासकाम झालेले नाही व नवीन रस्ते, गटार तयार करण्यात आलेले नाहीत. नगरपरिषद झाल्यापासून शहरातील नागरिकांना रस्त्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. शहरात चांगले रस्ते नसल्याने शहरातील नागरिकांत संतप्तेचे वातावरण निर्माण झालेले आहे. नगरपरिषदेच्या हलगर्जीपणाचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. ‘ या रस्त्यांवरुन कसे चालायचे?’, हा प्रश्न जनतेला पडत आहे.
नगरपरिषदेने शहरातील विकासकामांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेले आहे. नगरपरिषदेने चांदवड शहरातील विकासकामांच्या निधीची वाट लावून टाकलेेली आहे व विकासकामांची धजिया उडवून ठेवलेली आहे. चांदवड शहरात ग्रामपंचायत होती तेव्हा विकासकामे होत होती, लोकांचे प्रश्न, समस्या सुटायच्या, शहरातील रस्ते चांगले होते. यामुळे शहरवासीयांना असे वाटू लागले आहे की, नगरपरिषदेपेक्षा ग्रामपंचायतच चांगली होती.
चांदवड शहरातील सर्व रस्ते वाळू, स्टील व चांगल्या क्वालिटीच्या सिमेंटमध्ये बांधण्यात यावेत. कचमध्ये रस्त्याचे काम करू नये. रस्ते बनविण्याआधी अंडरग्राउंड ( नळजोडणी, वायरिंग ) ची सर्व कामे करवून घ्यावीत व त्यानंतरच रस्त्याचे काम करावे. जो ठेकेदार रस्त्याच्या कामाचे हमीपत्र ‘ १० वर्ष हे रस्त्याचे काम टिकेल की, २० वर्ष टिकेल ‘ असे लिहून देईल त्याच ठेकेदाराला काम देण्यात यावे. चांदवड शहरात नगरपरिषदेने विकास कामांसाठी किती निधी खर्च केला हे जागोजागी जाहीर फलक लावून जनतेला कळू द्यावे. लवकरात – लवकर चांदवड शहरातील सर्व वॉर्डस्, कॉलनीतील सर्व रस्ते व गटार नवीन व चांगल्या दर्जाचे बांधण्यात यावे व प्रशासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, राजाभाऊ अाहिरे यांच्या वतीने नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी बंडू कापडणी, शिवाजी जाधव, निलेश जगताप, निलेश निकम, चंद्रकांत कसबे, दीपक मोरे, किरण केदारे, वसीम शेख, भूषण आबड, अशोक केदारे, सुमित शिंदे, वाईद शेख, जीवन कसबे, अरुण केदारे, प्रशांत उबाळे, विकी गोसावी, किशोर बनकर, निलेश शेवाळे, फकीरा जाधव, बंडु जाधव, रवि बनकर, मंगेश गायकवाड, विकी काळे, रोशन निरभवणे, समाधान आहेर, अंकुश घोलप, सचिन क्षत्रिय, देविदास बनकर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037