प्रशांत वांगड / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार जि पालघर
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये वाळवंडा या गावातील आदिवासी समाजातील श्री.भिकल्या लाडक्या धिंडा .वय वर्ष 85 यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या स्मरणार्थ आजादी का अमॄत महोत्सव अंतर्गत संगीत नाटक अकादमी अमॄत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.यांमध्ये 75वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आणि त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत भारतीय परफॉमिंग आर्ट्सच्या क्षेत्राततील कोणत्याही राष्ट्रीय सन्मानाने सन्मानित न झालेल्या कलाकारांचा समावेश आहे.संगीत नाटक अकादमीने 86 कलाकारांना हा अमॄत पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर एक लाख रुपये बक्षीस वितरण करण्यात आले आहे.आज महाराष्ट्रातील सर्व जनते समोर एक उत्कृष्ट तारपा वादक कलाकार म्हणून आदिवासी समाज बांधवांची अजून मान उंचावली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037