जाहिद शेख / उपसंपादक – दक्ष पोलीस वार्ता, नाशिक
मुंबई, शनिवार – मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज महिलांबद्दल निर्लज्ज भाषेत विधान करणारे भाजपचे दलाल रामदेव बाबा यांच्या विरोधात राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले.
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री एवढे माजले आहेत की सार्वजनिक ठिकाणी वाचाळ वक्तव्य करून स्त्रियांचा अपमान करण्याची संधी सोडत नाहीत. आता त्यांचे दलाल रामदेव बाबा यांनी उपमुख्यमंत्रांच्या पत्नी समोर असताना स्त्रियांबद्दल अभद्र, अपमानास्पद, असभ्य वक्तव्य करून सर्व सीमा पार केल्यात. रामदेव बाबांच्या विरुद्ध आंदोलन करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले व त्यांच्या पतंजली उत्पादनाची होळी करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिलांचा अपमान सहन करणार नाही व यापुढे अशी वक्तव्य करणाऱ्यांची आम्ही गय करणार नाही, अशा भाषेत मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव यांनी इशारा दिला आहे.
यावेळी मुंबई कार्याध्यक्षा सौ राखीताई जाधव, कार्याध्यक्ष – नरेंद्र राणे, राष्ट्रीय प्रवक्ते – क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते – संजय तटकरे, जिल्हाध्यक्ष दक्षिण मुंबई महेंद्र पानसरे, जिल्हा निरीक्षक – प्रमोद पाटील, महिला अध्यक्षा – सुरेखा पेडणेकर, युवती अध्यक्षा – आदिती नलावडे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष – सुनील शिंदे, विद्यार्थी अध्यक्ष – प्रशांत दिवटे, प्रदेश /मुंबई पदाधिकारी सर्वश्री – मनीषा रहाटे , भालचंद्र शिरोळे, अशोक पांचाळ, राजेश शाहू, श्रीरंग देटे, महेंद्र टिंगरे, शिवकुमार माळी, दिगंबर कुमठेकर, प्रवीण ठाकूर , मनोज आम्रे, मोरेश्वर मोहिते, महिला , मुंबई मिडिया समन्वयक दिपक पारडीवाला, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष , तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037