अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांची कोल्हापूर येथे मराठी चित्रपट निर्माते यांचेसह बैठक झाली.या बैठकीत
मराठी चित्रपट अनुदान व्यवस्थेत पारदर्शकता असावी. परिक्षक समितीने दिलेले गुण सर्वांना मिळावे. किंवा माहिती अधिकार कायदा अंतर्गत माहिती मिळावी .
अनुदान समिती जास्तीत जास्त चित्रपटाचे अनुदान नाकारते त्यांचे कारणही देत नाहीत. अनुदान नाकारण्याचे कारण समजावे. पारदर्शकता जास्तीत जास्त असावी. निर्माते यांना गुणांकन कळवत नसल्याने गुणप्रक्रीयेत काही गडबड होते का ? असे निर्माते यांचा आक्षेप आहे.
मराठी चित्रपटाचे अनुदान योजना राबवताना शासनाने दोन पद्धतीचा अबलंब करावा. सरसकट २५ लाख रूपये आणि ज्या निर्मात्यांना ग्रेड पध्दतीने म्हणजे अ वर्ग किंवा ब वर्ग पाहिजे त्यांना अ वर्ग करीता ७५ लाख आणि ब वर्ग करीता ६० लाख रूपये अनुदान मिळावे.
मराठी चित्रपटांना थिएटर शेअरिंग मध्ये उपलब्ध करावे.
अनुदान प्रस्ताव शासनाकडे देतांना पेपरलेस पध्दती असावी. चित्रपट सेन्सार सर्टिफिकेट शासनाकडे दिल्यानंतर त्वरीत अनुदान मिळावे.
अनुदान समिती जाहीर करतांना निर्माता यांचा जास्तीत जास्त सहभाग असावा. (सेलेब्रिटी म्हणजे चित्रपट व्यवसाय किंवा सेलेब्रिटी हेच तज्ञ आहेत असे समजू नये.
चित्रपट धोरण समिती मध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांचे प्रतिनिधी घेण्यात यावे.
चित्रपट प्रदर्शित करण्याच्या युएफओ , क्युब, स्क्रॅबल, के सेरा सेरा या सारख्या चित्रपट प्रदर्शित पध्दतीचे अपलोडींग आणि शो चार्जेस कमी करावेत.
मल्टिप्लेक्स मध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी तारीख सात दिवस आधी मिळावी . सध्या फक्त दोन दिवस आधी शो व थिएटरचे कन्फर्मेशन मिळते
वरील मागण्या अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३० एप्रिल रोजी मा.दादासाहेब फाळके यांच्या दादर येथील पुतळ्याजवळ एक दिवस उपोषण करण्यात येणार आहे
उपोषण करूनही शासनाने दुर्लक्ष केले तर बाळासाहेब गोरे यांच्या नेतृत्वाखाली कलानगरी कोल्हापूर ते चित्रनगरी मुंबई पर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे असे बाळासाहेब गोरे (कार्याध्यक्ष) यांनी सांगितले आहे.
सदर प्रसंगी देवेंद्र मोरे (संस्थापक अध्यक्ष),
बाळासाहेब गोरे (कार्याध्यक्ष), विजय शिंदे (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष) महादेव साळोखे, रंगराव कोटकर, सतिश बिडकर, अशोक सुर्यवंशी, गीतांजली डोंबे, अशोक जाधव, मेघना निकडे, संगीता पिंगळे, डॉ दिलीप आबनावे, राजू जाधव, अनिल काशिकर, उत्कर्ष कुरबेट्टी, संगीता गुणवंत, अस्मिता पंडित, विष्णू पवार, तारा डाके, शैलेंद्र पंडित, गौतम कांबळे, सुनील देसाई यांचेसह अनेक निर्माते आणि चित्रपट व्यवसायिक उपस्थित होते.