अन्य

नशीक मोक्का मधील फरार आरोपीस ठाणे जिल्हयातुन गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

               सातपुर पोलीस ठाणे हद्दीत महिंद्रा सोना कंपनीजवळ आरोपीतांच्या स्कोडा गाडीने पाठीमागुन धडक देवुन जुन्या वादाचा राग मनात ठेवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी राहुल मच्छिद्र पवार व साक्षीदार नामे तपन जाधव यांचेवर आरोपीतांनी संगनमताने त्यांचे जवळ असलेल्या अग्निशस्त्रातुन गोळीबार करून यातील फिर्यादी व साक्षीदार यांना जखमी केले तसेच दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने वार करून फिर्यादी व साक्षीदार यांना जखमी केले होते. म्हणुन सातपुर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर ६४ / २०२३ भादंविक ३०७, १४३, १४४, १४७, १४९, ३८५, ३९२, १२० (ब), शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५, ४/२५, ५/२५, मपोका १३५ सह मोक्का कलम ३ (१) (ii), ३ (२), ३(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दिनांक १९/०३/२०२३ रोजी दाखल आहे.

              सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेण्याकरिता मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर व मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप४r आयुक्त (गुन्हे) यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेशीत केले होते.

          त्याअनुषंगाने गुंडा विरोधी पथकाने गुन्हयातील फरार आरोपीताचा कोणताही सुगावा नसतांना मानवी कौशल्य तसेच तांत्रिक कौशल्य वापरून सपोनि / ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील अंमलदार यांनी गुन्हयातील पाहिजे आरोपी सराईत गुन्हेगार चेतन यशवंत इंगळे वय २५ रा. रा. फ्लॅट नं ८ ओम अर्पामेंट कर्णनगर आर.टी.ओ जवळ पंचवटी नाशिक हा ठाणे जिल्हयातील काशिमिरा पोलीस ठाणे हददीतील घोडबंदर रोड परीसरात असल्याची गोपनीय माहीती मिळाल्याने आज दिनांक ०६/०७/२०२३ रोजी ठाणे जिल्हयातील काशिमिरा पोलीस ठाणे हददीतुन आरोपी चेतन यशंवत इंगळे यास ताब्यात घेतले. व पुढील कारवाईसाठी सातपुर पोलीस ठाणेचे तपासी अधिकारी यांचे ताब्यात दिले आहे.

              सदरची कामगिरी मा.श्री.अकुंश शिंदे, पोलीस आयुक्त नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) नाशिक शहर. श्री डॉ सिताराम कोल्हे सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शना खाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, डी. के. पवार, प्रदिप ठाकरे, मिलीन जगताप, गणेश भागवत, गणेश नागरे, सुनिल आडके, राजेश सावकार, अक्षय गांगुर्डे, संदीप आंबरे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत