अन्य

दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने बेकायदेशीररित्या तलवार बाळगणा-या इसमास केले त्याच्या हत्यारासह जेरबंद

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

               अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळणारे दरोडा व शस्त्र विरोधी पथकातील पोलीस अंमलदारांना दि. ०६/०७/२०२३ रोजी गुप्त बातमी मिळाली की इंदीरानगर पोलीस स्टेशन हद्दीत इसम नामे पांडुरंग उर्फ अजिंक्य तुकाराम काळे वय २० वर्षे राहणार- रो हाउस नं. ११, आनंद नगर, पाथर्डी फाटा, नाशिक हा हातात तलवार सारखे हत्यार घेवुन आनंद नगर, पाथर्डीफाटा परिसरात फिरत आहे. सदरच्या माहीतीवरून दरोडा व शस्त्र विरोधी पथक नाशिक शहर यांनी इसम नामे पांडुरंग उर्फ अजिंक्य तुकाराम काळे वय २० वर्षे रा. रो हाउस नं. ११, आनंद नगर, पाथर्डीफाटा, नाशिक यास सापळा रचुन ताब्यात घेतले. त्याचेजवळ 09 धारदार लोखंडी तलवार जवळ बाळगतांना मिळुन आल्याने व त्याने मा. पोलीस आयुक्त कार्यालयाकडील शस्त्र बंदी मनाई आदेशाचे भंग केल्याने त्यांचे विरुद्ध इंदीरानगर पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम कलम ४/२५, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                 सदरची कामगिरी मा. श्री अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे), नाशिक शहर, मा. श्री. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व शस्त्र विरोधीपथक मधील सपोनि / किरण रोंदळे व पोलीस अंमलदार १ ) पोहवा / विजयकुमार सुर्यवंशी २ ) पोना / मोहन देशमुख ३ ) पोअं. / संदीप डावरे ४) पोअं / महेश खांडबहाले ५) पोअं / महेंद्र साळुंखे ६ ) पोअं / प्रविण चव्हाण ७ ) मपोअं / मनिषा कांबळे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत