जुल्फेखार शेख / प्रतिनिधि – दक्ष पोलीस वार्ता
दि.०६/०८/२०२३ रोजी Dysp संदीप मिटके यांना ममदापूर शिवारातील अंबिका नगर येथे काही लोक गावठी हातभट्टी लावून गावठी दारू तयार करीत असले बाबत गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाले वरून तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमूद ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी १)सुखदेव मुरलीधर गिरे २)किरण नारायण पवार दोघे रा.अंबिकानगर ममदापूर ता. राहाता असे गावठी दारू तयार करतान मिळून आले त्यांचे ताब्यात खालील वर्णनाचे व किमतीचे मुद्देमाल मिळुन आले आहे.
१)१,२६,००० रुपये किमतीचे गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन एकूण १८००लिटर
२)४,००० रुपये किमतीचे गावठी तयार हातभट्टी दारू ४० लिटर
सदर बाबत पोलीस नाईक अशोक शिंदे यांचे फिर्यादीवरून लोणी पोस्ट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 456 /2023 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ क ड ई)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा .पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला, माअप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर, Dysp संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली psi योगेश शिंदे,इरफान शेख, अशोक शिंदे , कृष्णा कुरे, श्याम जाधव , दिनेश कांबळे,आप्पा थोरमीस, असीर सय्यद यांनी केली.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037