आनंद अगरवाल /प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता
पुणे पोलीस आयुक्तालयातील कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे सोहेल नवाज शेख उर्फ पठाण, वय २२ वर्षे, रा. स.नं. ५, आश्रफनगर, गल्ली नं. ११, कोंढवा बुद्रुक, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह कोंढवा व वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता, चॉपर, तलवार, सुरा, लोखंडी रॉड या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राने साधी दुखापत करणे, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द १० गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम. पी. डी. ए. कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्या मध्ये श्री. संतोष सोनवणे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन पुणे व श्री. राजु बहिरट, पोलीस उप-निरीक्षक, पी. सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.
मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मा. पोलीस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही ३५ वी कारवाई असून, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037