अन्य

पुणे मुबंई एक्सप्रेसवर दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प, केमिकल टँकरचा स्फोट तीन जण होरपळून ठार

Spread the love

सुमित अग्रवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पुणे 

                    मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकल टँकरचा भीषण अपघात झाला असून अपघातानंतर टँकरने पेट घेतल्याने मुंबई-पुण्याची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. तेलाच्या स्फोटा मुळे संपूर्ण महामार्गावर आगीचे लोळ पाहायला मिळत आहे.

                मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ ओव्हर ब्रीजवर ऑइल टँकरचा अपघात होऊन भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे ब्रीज खाली देखील अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. ही आग लगल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून सध्या वाहतूक लोणावळा शहरातून वळवली जात आहे. एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

                   मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटातील कुणे पुलावर भीषण अपघात झाला आहे. केमिकलची वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन मोठा अपघात झाला टँकरने पेट घेतला. या अपघातामुळे टँकरमधील केमिकल रस्त्यावर सांडलं आणि मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे रस्त्यावर केमिकल सांडल्याने एक दुचाकीस्वार यावरून घसरला यामध्ये दुचाकीवरील १२ वर्षांचा मुलगा होरपळून ठार झाला तर त्याचे आई वडील गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुर्घटनेत टँकर चालकही गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे. तर पोलीस आणि मदतकार्य घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातामध्ये आतापर्यंंत एकूण तीन ठार आणि तीन गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत