आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता
दिनांक ०५/०७/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्हा हद्दीतुन तडीपार केलेला आरोपी प्रशांत सुरेश कांबळे, वय २६ वर्षे, रा. आनंदनगर झोपडपट्टी, नरेश सुपर मार्केटसमोर, मूल राहणार – हासोरी, ता. निलंगा, जि. लातुर हा मिळुन आल्याने त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तडीपार आदेशाचा भंग करुन गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली असुन त्याचेकडुन होणा-या दखलपात्र गुन्हयास प्रतिबंध केला आहे.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री.प्रविणकुमार पाटील,मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील,मा.सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री.विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय पुराणिक, यांच्या पथकाने केली आहै.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037