आनंद बंसल-प्रतिनिधि/दक्ष पोलिस वार्ता
शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये शनिवारी दि. ३ जुलै २०२३ रोजी सातारा शहरातील राधिका एका चौकामध्ये पाच इसमांनी ओंकार पिलाजी पवार यांना कोयत्यांचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील जवळपास २८०० रुपये रोकड जबरदस्तीने काढून घेतली होती. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या चारचाकी गाडीवर कोयत्या मारुन दहशत पसरली होती अशी तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यांने त्या अनुषंगाने तत्परतने सदर गुन्ह्याचा तपास अवघ्या काही तासांत शाहूपुरी पोलिस व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लावला. सदर आरोपींना मसवे येथे वेण्णानदी पात्रातून ताब्यांत घेण्यात आले. सदर आरोपींच्या कब्जांतून वापरलेला कोयता, लोखंडी पाईप दोन चाकी असा एकूण २१०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सौरभ नितीन सपकाळ (वय २५) रा. रघुनाथपुरा पेठ करंजे) अक्षय संतोष कदम (वय २०) रा. करंजे पेठ सातारा) अक्षय संतोष कदम (वय २०) रा. गडकरी अळी सातारा) अतिश गौतम राजगुरु (वय २२) रा. दौलतनगर सातारा अल्पविन मुलाचा समावेश) अशी आरोपींची नावे आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे सहा. पो.नि.प्रशांत बंधे पो. हवा. सुरेश घोडके सचिन माने, महेश बनकर, अभय साबळे, निलेश काटकर, पो. कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत, सुमित मोरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत घेतला.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037