अन्य

नाशिक बसचे स्टेअरींग पहिल्यांदाच महिला चालकाच्या हाती!

Spread the love

सागर पाटील/ उप संपादक -दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

 

             एसटी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांच्या हाती स्टेअरिंग आहे. नाशिक ते सिन्नर या मार्गावर प्रथमच एका महिला चालकाने एसटी महामंडळाची बस चालवली. माधवी साळवे असे या महिला चालकाचे नाव आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

                  माधवी साळवे या नाशिकमधील पहिल्या एसटी महिला ड्रायव्हर ठरल्या आहे. नाशिक मधील धुडगाव येथे राहणाऱ्या माधवी यांचा गृहिणी ते बस ड्रायव्हर असा प्रवास कौतुकास्पद आहे.. एसटी महामंडळाने सन २०१९ च्या भरती प्रक्रियेत २०६ महिलांची चालक या पदावर निवड केली.

                     या सर्व महिलांना एक वर्ष हेवी व्हेईकल चालवण्याचे ट्रेनिंग देण्यात आले. त्यानंतर या महिलांनी एक वर्ष एसटी बस चालवण्याचा सराव केला आणि आता या महिलांना एसटी बसवर रीतसर रूजू करून घेण्यात आले आहे. माधवी यांना लहानपणापासून गाड्या चालवण्याची आवड आहे. एसटी महामंडळात कुणीही महिला नसल्याने एसटीची निवड केल्याचे माधवी सांगतात. जास्तीत जास्त महिलांनी या क्षेत्रात येण्याचे आवाहन त्यांनी केले.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत