आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान,राष्ट्रीय पर्यटन विकास आणि सांस्कृतिक कला महोत्सव संस्थान अधिवेशन २०२३ अंतर्गत राष्ट्रीय पर्यावरण दिवसा निमित्त प्रथम आंतरराष्ट्रीय पर्यावरण एवं पर्यटन अधिवेशन अंतर्गत अप्रतिम सोहळा न्यू दिल्ली येथील हिंदी भाषा भवन येथे संस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे सर, राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. रागिणी चवरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
या अवर्णनीय जल्लोषपूर्ण समारंभात देशातील अनेक राज्यांमधून पर्यावरण मित्र सहभागी झाले होते. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामधून संस्थानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजणांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर अतिथी विशेष आयपीएस अधिकारी आंनदकुमार मिश्रा, राजस्थान बाडमेरचे पर्यावरणप्रेमी मुलाराम बाना, या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर अतिथी विशेष म्हणून संस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे सर, राष्ट्रीय उपाध्यक्षा तथा ह्यूमन राईटच्या अध्यक्षा डॉ. रागिणी गणेश चवरे, राष्ट्रीय संघटक गोविंद प्रजापती, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण संस्थानचे अध्यक्ष दिनेश उघडे, पर्यावरण संस्थानचे ठाणे जिल्हाध्यक्ष मेहबूबभाई पैठणकर, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय बोरगे, साहित्यिक व्यक्तित्व हिंदी कवि डॉ. मनोज कामदेव, दिल्लीहून डॉ. ओमप्रकाश प्रजापति, ठाणे वरून स्वेता प्रितम घेगडमल, ऍड शरद थोरात हे सर्व अतिथी मान्यवर उपस्थित होते.
दिल्ली हून पर्यावरण संस्थानचा समारंभ आटपून कल्याणकडे जातांना नासिक रोड येथे पर्यावरण संस्थेच्या कार्याला नव्याने जोडणाऱ्या पर्यावरण मित्रांनी ठाणे जिल्हा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण संस्थानचे अध्यक्ष दिनेश उघडे, पर्यावरण संस्थानचे ठाणे जिल्हाध्यक्ष मेहबूबभाई पैठणकर, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय बोरगे स्वेता प्रितम घेगडमल यांचे नाशिकरोड स्टेशन वर मान्य वरांचे स्वागत दक्ष पोलीस वार्ता मुख्य संपादक साजिद जाफर शेख चेतन गणपतराव थोरात अकबर भाई पैठणकर संजय बाबुराव घुले ऋषिकेश जयंत नारद गणेश छाजेड यांनी जोरदार स्वागत केले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037