अन्य

आय ए एस अधिकारी 8 लाखांची लाच घेतांना पुण्यात रंगे हात पकडले घरात सापडले 6 कोटी ची रोख रक्कम सी बी आय कडून अटक

Spread the love

अमित गर्ग / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पुणे

                   पुणे येथे एका आयएएस अधिकाऱ्यावर लाचखोरी प्रकरणी सीबीआय च्या पथकाने लाच घेतांना त्याला अटक केली त्याच्या घरात छापा टाकला त्याच्या घरातून स्थावर मालमत्तेची कागदपत्रे हाती लागले 6कोटी ची रोख रक्कम मिळाली नोटांची मोजणी करण्यासाठी दोन मशीन मागावे लागले अप्पर महसूल विभागीय आयुक्त डॉ अनिल रामोड असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे अनिल रामोड यांच्या विधान भवनातील कार्यालयात पाच तासांची कार्यवाही ही करत सीबीआय ने त्याला अटक केली पुणे विभागीय आयुक्त्त कार्यालयात अप्पर आयुक्त्त म्हणून काम पाहत होता त्याच्या बाबत काही दिवसांपासून तक्रारी येत होत्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील शेतकऱ्याने सीबीआय कडे तक्रार केली होती शुक्रवारी 8 लाखांची लाच घेतांना रंगेहात पकडले अनिल रामोड याच्या कडे आता पर्यन्त 6कोटी रूपये रोख डेक्कन येथे एक फ्लॅट ऐक हॉटेल शंभाजी नगर येथे जमीन फ्लॅट नांदेड येथे 14/15 कोटी किमतीची जमीन बाणेर येथे ऐक फ्लॅट असे कागजपत्र मिळाले सीबीआय तक्रार आल्या पासून माहिती गोळा करीत होते संपूर्ण शहानिशा झाल्या नंतर सुमारे 30 आधिकाऱ्यांचा समावेश सीबीआय ने सापळा रचून ऑपरेशन पूर्ण केले.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत