अन्य

तरुणीचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू

Spread the love

रमिन काद्री / विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता, निफाड

                आज सकाळी सात वाजेच्या सुमारास तन्वी विजय गायकवाड (17) राहणार रुई तालुका निफाड ही महाविद्यालयीन शिक्षण घेणारी तरुणी उगाव खेडे येथील पुलावरून आपल्या स्कुटीने कॉलेजला जात असताना ती स्कुटी सह पाण्यात तोल न अवरल्याने पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

                   दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी सात वाजता ही तरुणी स्कुटीने रानवड येथे कॉलेजला जात असताना ही घटना घडली त्यानंतर स्थानिकांनी तिला पाण्यातून बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न केले परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना अपयश आले.

                     येथील नागरिकांनी तन्वी चा शोध घेतला असता ती शिवडी येथील नदीच्या पुलावर आढळून आली, दरम्यान पुढील उपचारासाठी तिला तत्काळ निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

साजिद शेख 

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत