अन्य

खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर गणेश विष्णु अडागळे उर्फ सुंद्री गण्या व त्याचे इतर २ साथीदार यांचेवर मकोका अंतर्गत कारवाई

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

               दिनांक ३०/०६/२०२३ रोजी बोपोडी येथील राहते घरातुन भाजीपाला आणणेकामी फिर्यादी हे बाजारात जात असताना बोपोडी येथील छाजेड पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले असताना त्यांचे मागुन मोपेड गाडीवर बसुन आरोपी नामे, गणेश विष्णु अडागळे उर्फ सुंद्री गण्या व त्याचे इतर साथिदार असे त्यांच्या रांगेची लाईन तोडुन येवुन, फिर्यादीच्या गाडीला धक्का दिला, त्याबाबत फिर्यादी यांनी त्यांना जाब विचारल्याचे कारणावरून, त्यांनी फिर्यादीस धक्काबुक्की व शिवीगाळ करुन, आम्ही या एरियाचे भाई आहोत तु ओळखत नाही काय असे म्हणुन त्यांचेसोबत ठेवलेले लोखंडी हत्यार काढुन, फिर्यादीचे डोक्यावर मारून,त्यांचेकडील हत्यार हवेत फिरवुन तेथील लोकांना दमदाटी केली होती. त्याबाबत फिर्यादी यांनी खडकी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेने सदरबाबत खडकी पो.स्टे गुन्हा रजि नं. १९५/२०२३ भा.द.वि. कलम ३०७,३२३,५०४, ५०६, ३४, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५,क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

                दाखल गुन्ह्याचा तपास करता सदर गुन्ह्यात गणेश विष्णु अडागळे उर्फ सुंद्री गण्या, वय २० वर्षे, रा. बापु काटे चाळ,वार्ड क्र. ३, दापोडी, पुणे (टोळी प्रमुख ) ( अटक) २) दोन विधीसंघर्षीत बालक हे ताब्यात असुन,ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यातील टोळीप्रमुख हा सध्या येरवडा कारागृह येथे असुन, यातील दोन विधीसंघर्षीत बालके यांना सुधारगृहात ठेवण्यात आलेले आहेत.

                 गुन्ह्याचे तपासामध्ये गणेश विष्णु अडागळे उर्फ सुंद्री गण्या, वय २० वर्षे, रा. बापु काटे चाळ, वार्ड क्र.३,दापोडी,पुणे (टोळी प्रमुख) याने त्याच्या प्रत्येक गुन्ह्यात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करुन बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्यावतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिसांचाराचा वापर करुन किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपले बेकायदेशीर कृत्य चालु ठेवुन, संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

                यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे व टोळीचे इतर फायद्याकरीता सदरचा गुन्हा केलेचे दिसुन आलेने त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसलेने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१)(ii)३(२),३(४) चा अंतर्भाव करणेकामी खडकी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यांनी मा. पोलीस उप आयुक्त, परि-४, पुणे शहर, श्री. शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रदेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा यांना सादर केलेला होता.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत