अन्य

धाब्यावर दारू पिणे पडले महागात दारु वाहतूकीच्या दोन मोटरसायकली जप्त

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

               सोलापुर शहरातील हॉटेल राजवाडा येथे टाकलेल्या छाप्यात धाबा चालक व ४ मद्यपींना न्यायालयाने एकूण ३० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच विभागाने दारू ची वाहतूक करणाऱ्या दोन मोटरसायकलीही जात केल्या.

             गुन्ह्यातील तपास अधिकारी यांनी एका दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र गुरुवारी न्यायालयात सादर केले असता, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी दारूबंदी न्यायालय यांनी हॉटेल चालकाला २५ हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश जवान शोएब बेगमपुरे यांच्या पथकाने पार पडली. एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक कृष्णा सुळे यांनी सोलापूर शहरातील गुरुनानक चौक ते गांधीनगर रोडवर सुरेश बाळू पवार (वय ३०, रा. दोडी तांडा) या इसमाला दोन रबरी ट्यूबमधून १२० लिटर हातभट्टी दारुची मोटरसायकल क्र.एमएच. १३. बीएम ०६५२ वरून वाहतूक करताना पकडले. या कारवाईदरम्यान एकूण ६६ हजार २०० किंमतीचा मुद्देमाल जात करण्यात आला. या कारवाईत दुय्यम निरिक्षक कृष्णा सुळे, जवान चेतन हनी किरण खंदारे यांनी सहभाग घेतला तसेच माढा येथे एस.टी. स्टँड जवळ अतुल अरुण करके (वय-३९.रा. साठे गड़ी, माढा) या इसमास त्याच्या मोटरसायकल क्र. एमएच ४५. जे. ६४३६ वरून एका प्लास्टीक पोत्यामध्ये रॉयल स्टंग हा १८० मिलीच्या ४८ बाटल्या वाहतूक करतांना अटक केली. या कारवाईत ४८ हजार ६६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरिक्षक किरण बिरादार, जवान गणेश रोडे व वाहनचालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत