अन्य

उत्तरप्रदेश येथे पळुन जाण्याच्या तयारीत असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपीस केले शिताफीने अटक

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

                गगनगिरी शाळेजवळ, संतोष नगर, कात्रज, पुणे या ठिकाणी फिर्यादी हे त्यांचे मुलीसह घरात हजर असतांना त्यांचे बहीणीचा चुलत भाचा नामे प्रदीपकुमार नारीया यांने त्यांचे घरात येवुन जुन्या भांडणाच्या कारणांवरुन फिर्यादी व फिर्यादी यांचे मुलीस शिवीगाळ करुन त्यांना जीवे ठार मारणेच्या उददेशाने त्याचेकडील लोखंडी हत्याराने त्यांना मारुन गंभीर जखमी केले होते. म्हणुन भारती विद्यापीठ पुणे शहर गुन्हा रजि.नं.४७२/२०२३, भा.दं.वि. कलम ३०७,५०४,३२३ महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.

                 दाखल गुन्हयातील आरोपी प्रदीपकुमार नारीया हा मुळचा उत्तरप्रदेश राज्यातील असल्यामुळे तो उत्तरप्रदेश मध्ये पळुन जाण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना आरोपीचा शोध घेणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार सदर आरोपीचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना आरोपी हा केदारीनगर, कोंढवा भागात फिरत असुन तो उत्तरप्रदेश येथे त्याचे मुळ गावी पळुन जाण्याच्या तयारीत आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी केदारीनगर, कोंढवा, पुणे भागात जावुन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी प्रदीपसिंग बुट्टे नारिया, वय ३० वर्षे, रा. केदारीनगर, कोंढवा, पुणे मुळगाव- शहारी दाऊदपुर, जालौर, उत्तर प्रदेश हा मिळुन आल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक आली आहे.

               सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री.विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीशकुमार दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, वर्षा तावडे, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत