अन्य

तडीपार आरोपीसह त्याचा साथीदार जेरबंद मोबाईल जबरी चोरीचे गुन्हे उघड गुन्हेशाखा युनिट क्र.१ ची कामगीरी

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

              नाशिक शहरातील जबरीने मोबाईल चोरीच्या गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त सो. नाशिक शहर, मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे, नाशिक शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी गुन्हेशाखेच्या | युनिट क्र. १ यांना मोबाईल फोन चोरी करणारे चोरटयांचा कसोशीने शोध घेवुन त्यांना जेरबंद करणे बाबत सक्त सूचना दिलेल्या होत्या.

             अंबड पोलीस स्टेशन येथे गुरनं.२५३/२०२३ भादविक ३९२, ३४ प्रमाणे दाखल झाला होता. त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस अधिकारी व अंमलदार सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना, दिनांक १९/०७/२०२३ रोजी पो.अं. २१५४ राहुल पालखेडे व पो. अं.ब.नं. २४५० | राजेश राठोड यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी गणेश विष्णु कु-हाडे व त्याचासोबत एक इसम हे लेखानगर वसाहतीचे इलेक्ट्रीक डी. पी. जवळ या परीसरात चोरीचे मोबाईल विक्री करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली व सदरची माहीती वपोनिरी. श्री. विजय ढमाळ सो. यांना कळविली असता, वपोनिरी. श्री. विजय ढमाळ सो. यांनी सपोनि / हेमंत तोडकर, पोहवा / १०९ प्रविण वाघमारे तसेच सोबत पो.ना / प्रशांत मरकड पो.ना / विशाल देवरे, पो.ना / महेश साळुंके, पो. अं. मुख्तार शेख, पो. अं. २४५० राजेश राठोड, तसेच चालक पो. कॉ. २४ अण्णासाहेब गुंजाळ अशांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

                त्याअनुषंगाने वरील नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे लेखानगर अंबड नाशिक या ठिकाणी छापा लावुन थांबले असता मोबाईल विक्री करणारे संशयीत हे त्या ठिकाणी आले असता पोलीस पथकाने त्यांना पकडण्यासाठी त्यांचे दिशेने पायी जावू लागलो असता, त्या इसमांना पोलीसांचा संशय आल्याने तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलीस पथकाने सदर इसमांना जागीच पकडुन ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे | नाव गाव विचारता त्याने त्यांची नावे १) गणेश विष्णु कु-हाडे, वय- २२ वर्षे, राह. इंदिरागांधी वसाहत क्र. १, भोलेनाथ मंदिराच्या बाजुला सिडको नाशिक २) राजेश एकनाथ वाघमारे, वय २४ वर्षे, राह. लेखानगर, राजीव नगर झोपडपट्टी, चड्डा पार्कच्या मागे, इंदिरानगर नाशिक असे सांगुन त्यांचे कडुन गुन्हातील चोरीस गेलेले मोबाईल फोन | जप्त करून त्याबाबतचा पंचनामा करण्यात आला व त्यांनी त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयांची कबुली दिली. त्यांचेकडुन गुन्हयातील मोबाईल, गुन्हयात वापलेली ग्रे रंगाची फोड फिगो चारचाकी वाहन असे एकुण ०१,००,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून अंबड पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुरनं २५३ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ व २८४ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ हे गुन्हे उघडकीस आले असुन | आरोपीतांना पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.

               सदर कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, श्री. अंकुश शिंदे सो. मा. पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे, प्रशांत बच्छाव सो. मा. सहा. पोलीस आयुक्त सो. डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / विष्णु उगले, पोहवा. प्रवीण. वाघमारे, नाझिमखान पठाण, महेश साळुंके, प्रशांत मरकड, विशाल देवरे, राहुल पालखेडे, राजेश राठोड, मुक्तार शेख, गौरव खांडरे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, चापोअं/ गुंजाळ तसेच युनिट २ चे चंद्रकांत गवळी केली आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत