सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक
सप्तश्रृंगी गड घाटात दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची सप्तशृंगी गड – खामगांव ही अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढण्यासाठी आज ता. १९ रोजी सकाळी ९.३० ते अपघातग्रस्त वाहन काढण्याची कार्यवाही पुर्ण होईपावेतो नांदुरी – सप्तशृंग गड बद ठेवण्यात येणार असल्याचा अद्यादेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी विशाल नरवडे यांनी दिला आहे.
आद्यस्वंयभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंगीगडावरील या घाट रस्त्यावरील गणेश टप्पा भागात १२ जुलै राेजी सकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची सप्तशृंगी गड – खामगांव ही मुक्कामी बस सप्तशृंगी गडावरून खामगांवला जात असतांना सुमारे ४०० फुट दरीत कोसळून भिषण अपघात झाला होता. यात एका महिला भाविकांचा मृत्यु तर बस चालक, वाहकासह २२ भाविक जखमी झाले होते. दरम्यान पाच दिवसांपूर्वी सांयकाळी राज्य परिवहन महामंडळाने दरीत कोसळलेली बस काढण्यासाठी दोन खाजगी क्रेन आणून बस दरीततून काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी बस रस्त्यापासून अवघ्या पन्नास फुटा पर्यंत खेचून आणली असता. दोन्हीही क्रेनचे वायर रोप तुटल्याने बस पुन्हा साडेचारशे फुट खाली गेली. दरम्यान राज्य परिवहन महामंडळाने अपघातग्रस्त बस काढण्यासाठी अतिरीक्त यंत्रसामुग्री असलेल्या क्रेन लखमापूर, दिंडोरी व पिंपळगांव येथून तीन क्रेन मागविण्यात आलेल्या असून बस काढतांना क्रेन घाटरस्त्यावर असणार असल्याने सुरक्षीतेच्या दृष्टीने व वाहतूकीस अडथळा येणार असल्याने राज्य परिवहन महामंडळाने नांदुरी ते सप्तशृंगी गड रस्ता बुधवार, ता. १९ रोजी सकाळी ९.४५ नंतर बंद ठेवण्याची मागणीचे पत्र उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, सप्तशृंगी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत आदींना दिले होते.
त्यानूसार सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ नुसार व मला असलेल्या अधिकारानुसार नांदुरी ते सप्तश्रृंगीगड व सप्तश्रृंगीगड ते नांदुरी हा रस्ता दिनांक १९/०७/२०२३ रोजी अपघातग्रस्त वाहन काढण्याची कार्यवाही पुर्ण होईपावेतो बंद करण्यात येत असल्याचा आदेश तसेच याबाबत कोणतीही जिवित व वित्त हानी होणार नाही याची दक्षता राज्य परिवहन महामंडळ यांनी घ्यावी असा आदेश दिला आहे.
“पाच दिवसांपूर्वी अपघात ग्रस्त काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तो अयशस्वी झाला होता. उद्या तीन क्रेन बोलविण्यात आल्या असुन दोन क्रेन बस ओढण्यासाठी तर एक क्रेन बस खाली जावू नये म्हणून लावून धरण्यासाठी असे नियाेजन करण्यात आलेले आहे. तसेच गडावरील मंगळवारी ता. १८ रोजी मुक्कामी असलेले भाविक गडावर अडकून पडू नये म्हणून सकाळी ९.४५ नंतर सदर घाट रस्ता बंद करण्यात येणार आहे.” –सुरेश पवार,आगार वाहतूक निरीक्षक,कळवण
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037