अन्य

येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर मोहरम कार्यक्रम शांतेत पार पाडण्यासाठी समन्वय बैठकीचे आयोजन

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

                    आज येरवडा पोलीस स्टेशन येथे मोहरम सण २०२३ च्या अनुषंगाने मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली मोहल्ला कमिटी व शांतता समिती सह मुस्लीम बांधव यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

                    सदर बैठकीमध्ये मोहरम सण शांततेत व उत्साहात तसेच सामाजिक सलोखा अबाधित ठेवुन आनंदाच्या वातावरणात पार पडावा या करीता येरवडा पोलीस स्टेशन, विश्रांतवाडी, चंदननगर, विमानतळ या पोलीस ठाणे यांचे कडील मुस्लिम धर्मियांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्तरित्या समन्वय बैठक येरवडा पोलीस स्टेशन, येथें १७/०० वा. आयोजित करण्यात आली होती. सदर वेळी मा. पोलीस उप-आयुक्त, परि ४, पुणे शहर, श्री शशिकांत बोराटे, मा.सहा. पोलीस आयुक्त श्री सजंय पाटील, येरवडा विभाग, श्रीमती आरती बनसोडे, खडकी विभाग, श्री दत्तात्रय भापकर, वपोनि विश्रांतवाडी, श्री बाळकृष्ण कदम, वपोनि, येरवडा पो.स्टे. बैठकीस उपस्थित होते.

                  सदर बैठकी वेळी ध्वनी प्रक्षेपणाबाबत मा. सर्वोच्च न्यायालय यांचे आदेशाचे उल्लंघन होणार नाही याबाबत सर्वानी दक्षता घेऊन ध्वनी प्रदुषण नियम २००० चे पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा ही आपली जबाबदारी असुन आपण ती घेतली पाहीजे या दृष्टीकोणातुन मज्जीद ट्रस्टींनी स्वतःचे स्वयंसेवक नेमावेत. की जेणे करून शासनास मदत होईल. सी. सी. टी. व्ही. कॅमेरेबाबत प्रत्येक मोहरम सण साजरा करणा-या व्यक्तीनी ज्या ठिकाणी पंजे, ताबुत बसविणार आहेत त्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करावी. तसेच शासनाकडुन वेळोवेळी आलेल्या आदेशाचे पालन करणे आपणास बंधनकारक राहील. तसेच पोलीसांच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे सोसायटी मध्ये पंजे किंवा ताबुत बसविण्याकरीता सोसायटीचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. पुणे महानगरपालिका यांची मंडपाकरीता परवानगी आवश्यक आहे स्वतःचे स्वयं-सेवक नेमणे आवश्यक आहे. कर्कश आवाज व लाईटींग लावणे बाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करणे हा कायदेशिर गुन्हा आहे. व त्या नुसार आपणावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत