अन्य

महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Spread the love

राजेंद्र कोल्हे/ प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , चांदवड

                  महाराष्ट्रात २ लाख कोटींच्या तब्बल २२५ प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मंजूरी देण्यात आली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच घोषणा केली आहे. मुंबईत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी मोदींनी संवाद साधत महाराष्ट्रात भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असे मोदी यांनी म्हंटले.

                 यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “गेल्या आठ वर्षात ८ कोटी महिला सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांना साडे पाच लाख कोटींची मदत देण्यात आली आहे. या ग्रुपशी जोडलेल्या महिला इतर महिलांनाही रोजगार देत आहेत. स्टार्टअप, लघु उद्योगांना संभाव्य आर्थिक मदत सरकार देत आहे. जेणेकरुन तरुणांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. सरकारच्या प्रयत्नांमधून रोजगाराच्या संधी दलित, आदिवासी, महिलांना समान स्वरुपात उपलब्ध होत आहे,”

               यावेळी मोदी पुढे म्हणाले की, आज देशभरात पायाभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. महाराष्ट्रातील प्रकल्पांवर काम सुरु आहे किंवा सुरु होत आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी ७५ हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी ५० हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत