अन्य

जव्हार मध्ये 46 सरपंच पदांसाठी 188 ऊमेदवार ; 439 सदस्यांसाठी 723 ऊमेदवार रिंगणात ; 117 सदस्य बिनविरोध

Spread the love

             जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळ उडाला असून गाव पाड्यात आपापला उमेदवार सक्षम करून संपूर्ण ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कशी यासाठी सर्वच पक्ष आपापले कौशल्य वापरत आहेत. . तालुक्यातील 48 पैकी 46 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. ऊमेदवारी अर्ज माघारी नंतर निर्णायक चित्र स्पष्ट झाले आहे. 46 सरपंच पदांसाठी 188 ऊमेदवार रिंगणात आहेत. तर 439 सदस्यांपैकी 117 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे ऊर्वरित 322 सदस्यांसाठी 723 ऊमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.

                तालुक्यातील 46 ग्रामपंचायतींसाठी 16 ऑक्टोबर ला मतदान होणार आहे. 47 सरपंच पदांसाठी 257 ऊमेदवार तर 439 सदस्य पदासाठी 971 ऊमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी मध्ये सदस्य पदाचे 10 ऊमेदवारी अर्ज बाद झाले होते. त्यानंतर 30 सप्टेंबर ला ऊमेदवारी ऊमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती. अखेरच्या दिवशी सरपंच पदांसाठी 68 ऊमेदवारांनी माघार घेतली आहे. तर सदस्य पदासाठी 121 ऊमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 117 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ऊमेदवारी अर्ज माघारी नंतर 46 सरपंच पदांसाठी आता 188 तर 323 सदस्यांसाठी 723 ऊमेदवार रिंगणात असल्याची माहिती जव्हार येथील तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत